AalandiPachhim Maharashtra

आळंदीत अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी निधीसह पाठपुरावा करू : आमदार मोहिते पाटील

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथिल साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही.  लवकरच या स्मारकाचे काम चालू करण्यासाठी पाठपुरावा करू,  असे विचार खेड आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.  साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती दिवसभर मोठ्या उत्साही विविध कार्यक्रम घेत साजरी करण्यात आली.  याप्रसंगी ते बाेलत हाेते.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाऊंडेशन महा.राज्य यांचे वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे हस्ते ज्येष्ठ पत्रकार तथा ब्रेकिंग महाराष्ट्रचे आळंदी विशेष प्रतिनिधी अर्जुन मेदनकर कोविड योद्धा प्रमाणपत्र स्वीकारताना . समवेत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर आदी मान्यवर. याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, फाऊंडेशन अध्यक्ष नानासाहेब साठे,खजिनदार सुरेशनाना झोंबाडे,सचिव सूर्यकांत खुडे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण करून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची ग्रंथ दिंडी चे पूजन करून सुरुवात करण्यात आली.  ग्रंथदिंडीचे पूजन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष माजी प्राचार्य नानासाहेब साठे यांनी केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे खजिनदार सुरेश नाना झोंबाडे व सचिव सूर्यकांत खुडे यांनी अर्पन केला. या प्रसंगी आळंदी जनहित फाउंडेशनचे प्रमुख अर्जुन मेदनकर, विक्रम कांबळे, सनी गवई, अनिल पाटोळे, हरिभक्त हनुमंत महाराज, आळंदी पोलीस स्टेशनचे मछिंद्र शेंडे उपस्थित होते. नगर पालिका चौक येथुन ग्रंथ दिंडीची व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मिरवणूक सुरुवात करन्यात आली. काळे कॉलनी – आळंदी नगरपरिषदेच्या नियोजित स्मारकाच्या जागेत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, आळंदीतील सेवाभावी संस्था, समाज बांधव दिंडीत सहभागी झाले होते. आळंदीतून दिंडी यशस्वी करण्यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे व दिघी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, आळंदी चाकण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लहू गीताने साहित्य दिंडीच्या समारोप करण्यात आला. नियोजित स्मारक जागेत प्रतिमा पूजन व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन सभा उत्साहत करण्यात आले.
आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे पाटील, शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका कोमलताई ढोबळे, माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, महाराष्ट्र न्यूजचे संपादक सनी दादर तसेच सामाजिक कार्यकर्ते
उपस्थित होते.
या प्रसंगी प्रास्ताविक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे सचिव सूर्यकांत खुडे यांनी केले.  महापुरुषांनी सर्वांसाठी काम केले आहे. त्याना जातीच्या बेडीत न बांधता महापुरुषांनी सर्वांसाठी काम केले आहे. जयंती नाचून नाही तर त्यांचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत. हे स्मारक आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी आशा त्यानी व्यक्त केली. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब साठे यांनी आपल्या मनोगतात स्मारकाचा लढा कशा पद्धतीने चालू आहे. यापुढे फाउंडेशन स्मारक पूर्ण होईपर्यंत असाच लढा चालू राहिल. स्मारक उभा करेल याविषयी आपले विचार व्यक्त केले. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव साहेब यांच्या मनोगतात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. स्मारकासाठी ज्या ज्या वेळेस लढा उभा करण्याची वेळ लागली तरी तो लढा उभा करून स्मारक पूर्णत्वास नेउ. त्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दल हे सदैव पाठपुरावा करेल असे सांगितले.
खेड आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी विचार व्यक्त करताना अण्णाभाऊंचे साहित्य कथा कादंबऱ्या लोकनाट्य आणि आपल्या समग्र लेखनातून साहेब त्यातून समाजाला प्रेरणादायी व आदर्शवादी आहे अनेक देशांमध्ये अण्णाभाऊंचे साहित्य पोहोचले आहे तसेच महापुरुष सर्व जातींचे असतात त्यांचे विचार आपण लक्षात घेतले पाहिजेत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये तसेच महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होऊ नये यासाठी प्रबोधनाची चळवळ संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा करण्याचे काम अण्णाभाऊ यांनी केलेले आहे. तसेच आळंदीच्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही व लवकरच या स्मारकाचे काम चालू करण्यासाठी पाठपुरावा करू असे सर्व समाज बांधवांना आश्वासन दिले
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या मनोगतात सत्तेतील समानता व मानवी जगण्यातलं वास्तव्य धोक्याचा संघर्ष आधारित केला उपेक्षित वंचित दुर्लक्षित माणूस त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी होता,. समाजक्रांतीचे शस्त्र घेऊन लढणारे अण्णाभाऊ हे नेहमी समाजातील उपेक्षित घटकांच्या बाजूने राहिले. तळागाळातील माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सामाजिक विकास होणार नाही यासाठी सर्वांनी एकमेकाला सहकार्य करण्याची गरज आहे. असे सांगितले.
तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवराना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये अर्जुन मेदनकर, अजित वडगावकर, अनिल जोगदंड, मचिंद्र शेंडे पोलीस कर्मचारी, पत्रकार, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आळंदी पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, सचिन गिलबिले, पारूबाई तापकीर, माजी नगरसेवक पांडुरंग वहिले, सचिन काळे, दिनेश घुले, प्रदीप बवले, माजी नगरसेविका शैलाताई तापकीर, मंगल वेळकर, कोंग्रेस युवानेते उमेश रानवदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अजय तापकीर, माजी उपसरपंच अमोल विरकर, शिवसेना शहराध्यक्ष अविनाश तापकीर, सचिन तापकीर, भाजप कार्याध्यक्ष बंडूनाना काळे,बापूसाहेब वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशन चे खजिनदार सुरेश नाना झोंबाडे यांनी मांनले.
व्याख्यात्या शिवकन्या प्राध्यापिका श्रद्धा शेटे यांनी आपल्या व्याख्यानात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार व त्यांचे कर्तृत्व आज सर्व जाती धर्माच्या माणसांना प्रेरणा देणारे साहित्य असलेले सांगितले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा लढा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. ही चळवळ अण्णाभाऊंच्या शाहिरीतून समाज प्रबोधन करण्याचे काम हे केलेले दिसून येते. महापुरुषांचे विचार आत्मसात करून घेणे गरजेचे आहे असे त्यांच्या व्याख्यानातून विचार व्यक्त केले. महापुरुषांच्या गीतांचा कार्यक्रम स्वर लावण्य यश लिखे व राजलक्ष्मी लिखे यांच्या टीमने अत्यंत सुंदर असा महापुरुषांच्या गीतांचा कार्यक्रम सादर केला.
कवी संमेलन
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त फाउंडेशन च्या वतीने कवी संमेलन आयोजित करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेविका विनया तापकीर या उपस्थित होत्या. कवी संमेलनाचे अध्यक्ष महेंद्र कुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. या कवी संमेलनात महाराष्ट्रातून कवी आले होते. यात आत्माराम हॉटेल अमरजीत गायकवाड रमेश जाधव, मनीषा सपकाळ, माने खंडागळे, सिताराम नरके, हेमलता भालेराव, सवाई लोखंडे, अलका जोशी, शैला जांभुळकर, अनिल नाटेकर, तृप्ती टकले, छाया थोरवे, सारिका माकोडे, साधू जाधव, विकास बोर्डे, कविता काळे, गणेश पुंडे, संतोष गायकवाड, पाटोळे सनी गवई यांचा समवेश होता. सूत्रसंचालन विश्वजीत साठे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विक्रम कांबळे, बाळशीराम पाटोळे, बालाजी पारवे, संतोष सोनवणे, बापूसाहेब वाघमारे, बाळासाहेब पाटोळे, अनिल पाटोळे, बाबासाहेब साधू, वैरागी सनी गवई, अजय मोरे, सुनील पाटोळे, राहुल बाजड, विजय जाधव, दिगंबर रसाळ, विशाल मुजमुले, विजय जाधव आदिनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन फाउंडेशनचे सचिव सूर्यकांत खुडे यांनी केले. आभार उद्योजक फौंडेशनचे खजिनदार सुरेशनाना झोंबाडे यांनी केले. सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!