Uncategorized

पालकांनो, लहानपणातच मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेचे बीज रोवा!

जीवघेणा संघर्ष आणि अती टोकाचे स्पर्धात्मक युग असल्याकारणाने बाल वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे. छोट्या छोट्या स्पर्धा परीक्षा दिल्याने आत्मविश्वास वाढीस लागतो आणि वाढत्या वयानुसार होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचे धैर्य विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत असते.
एकविसावे शतक अतिशय स्पर्धात्मक येत आहे, दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे, प्राथमिक आणि माध्यमिक वर्गात सुद्धा विविध स्पर्धा परीक्षा आयोजित होतात, त्या स्पर्धेमध्ये मुलांचा सहभाग नोंदवून पालकांनी विशेष अशी तयारी करून जर घेतली तर पुढील जीवनात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी सहज सामना करू शकतील. लहानपणीच जर स्पर्धा परीक्षेचा गोडवा मनात निर्माण झाला तर निश्चितच जीवनाला निश्चितच विशिष्ट असा आकार देता येऊ शकेल.
आज-काल पालक मुलांकडून डॉक्टर, इंजिनियर होण्याच्या अपेक्षा बाळगून आहेत .सर्वच पालकांना असे वाटते की माझा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर झाला पाहिजे. यासाठी मुले लातूर, पुणे, अकोला ,यासारख्या मोठ्या ठिकाणी जाऊन वर्ग लावत आहेत. मोठा खर्चही होत आहे. पालकांचा अट्टाहास हा काही मुलांना झेपत नाही. पण डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी इयत्ता बारावी ला द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा मग ती NEET असो की MH-CET असो, या सुद्धा स्पर्धा परीक्षा आहेत या परीक्षांसाठी सुद्धा बालपणापासून तयारी केलेल्या स्पर्धा परीक्षांचा उपयोग होऊ शकतो.
‘We become what we think about’
स्पर्धा परीक्षाची तयारी सुरुवातीपासून केल्याने सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकते याला मेहनतीची जोड असावी लागतेच म्हणून पालकांनी स्पर्धा परीक्षांवर भर देऊन ती सुद्धा तयारी करून घ्यावी कारण ज्यांच्या चरणातून मेहनतीच्या घामाचा सुगंध दरवळत असतो त्यांनाच यशाचा शिखर पादाक्रांत करता येतो.
शालेय जीवनामध्ये नवोदय प्रवेश परीक्षा ,शिष्यवृत्ती परीक्षा, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, एन टी एस, एन एम एम एस, एम टी एस इ ,आय एम ओ, आय एस ओ, एस एफ ओ आर टी एस इ, सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा, होमी भाभा विज्ञान परीक्षा आणि यासारख्या अनेक परीक्षा आयोजित केलेल्या असतात यासाठी पालकांनी सतर्क राहून संपर्क साधून तथा माहिती मिळवून आपल्या पाल्यांना यादृष्टीने तयारी करणे आवश्यक आहे.
मंजिल की जुस्तजू है तो कर जद्दोजहद
खैरात मे कभी चांद सितारे नही मिलते
लहान वयामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास मुलांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो ,मुले अधिक आत्मविश्वासाने कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊ शकतात. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते तसेच त्यांच्या विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढते. चाकोरी बाहेरचा सुद्धा विचार विद्यार्थी करू लागतात. विद्यार्थी वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रश्नांवर विचार करतात आणि त्यांची विचार करण्याची क्षमता अधिकाधिक वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी वेळेचं छान नियोजन करतात वेळेचे नियोजन ही एक महत्त्वाची बाब या स्पर्धा परीक्षेतून मार्गी लागते. विद्यार्थ्यांमध्ये यश आणि अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते आणि विद्यार्थी यश अपयशाचा सामना करू शकतात,पालकांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याचं विविध विषयाचे वाचन वाढते ,विविध विषयाचे ज्ञान वाढते आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुढील जीवनात तो तयार होत असतो. शेवटी महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांचा कल लक्षात येतो आणि पालकांना योग्य दिशा सापडते यावरच विद्यार्थ्यांचे यश आणि अपयश अवलंबून आहे एकदा का आपण यशस्वी झालो तर मग सर्व मिळाल्यासारखेच असते
Nothing Succed like Success.

पालकांसाठी हे निश्चितच एक आव्हान आहे इतक्या शिकवणी वर्ग शाळा यामधून विद्यार्थ्यांना म्हणजेच आपल्या पाल्यांना वेळ काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे पण असाध्यला सुद्धा साध्य करता येऊ शकते.
Challenging Risks Will Make You Crave.

( डॉ. मुकीम गालिब पटेल (मेरा बु)पदवीधर अध्यापक( गणित),  पी एच डी (इंग्रजी), नेट सेट इंग्रजी व मानसशास्त्र, एम एससी (गणित)बि एड.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!