करमाड बनले गुटखातस्करांचे हब?, जिल्हाभरात गुटखातस्करी जाेरात!
पैठण (शिवनाथ दौंड) – राज्य सरकारने गुटखा व्यवसायाला दहा वर्षांपासून बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र या बंदीला धाब्यावर ठेवून गुटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. औरंगाबाद तालुक्यातील करमाड परिसरात या गुटखा व्यवसायाचे जाळे मोठे प्रमाणत पसरले असून, या व्यवसायाच्या विळाख्यामध्ये अनेक बेरोजगार तरुण अडकल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले आहे. येणारी पिढी व्यसनाधीन होण्याची संकेत देत असल्याची चर्चेला आता ऊधान आले आहे.
गुटखा व्यवसायाला दहा वर्षांनी बंदी असतानाही या व्यवसायाचे होलसेल विक्रते हेआज ही करमाड येथे सक्रिय आहेत. या विक्रेत्या मार्फत करमाड सह परिसरात पिंप्रीराजा, जडगाव, शेकटा, गोलटगाव, गाढेजळगाव, शेवगा, जयपूर बनगाव, टोणगाव, शेंद्रा, पांढरी पिंपलगाव ,आदी ठिकानी सर्रासपणे टपऱ्या किराणा दुकान धारकांपर्यंत पोहोच विक्री केले जाते. या गुटका व्यवसाया मध्ये अनेक बेरोजगार तरुण दोन पैशाच्या अमिषापोटी बळी पडून गुंतले गेले आहेत. यामुळे तरुण पिढी ही गाव खेड वस्ती यामध्येही मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाल्याची चिंता तरुणांच्या आई-वडिलांमध्ये निर्माण झाली आहे. या व्यवसायाला बंदी असतानाही खुलेआम गुटखा पोलीस स्टेशनच्या भिंतीच्या बाजूला, शाळेच्या बाजूला, विक्री होते कशी असा प्रश्न आता या तरुणांच्या माता पिता यांकडून विचारण्यात येत आहे. मात्र याकडेही प्रशासन कानाडोळा करून आपले खिसे कसे भरतील हे लक्षात घेऊन गुटखा व्यवसायाला झुकतं माप देत असल्याचेही बोलले जात आहे. या अवैद्य गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानिक पोलीस आणि अन्नभेसळ विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
अशा पद्धतीने चालतो गुटखा व्यवसाय
या गुटका व्यवसायाची जिल्ह्यात आणि राज्यात मोठी टोळी सक्रीय आहे. या टोळी मार्फत सर्कलच्या एका ठिकाणी एक होलसेल गुटखा विक्रेता तयार केल्या जातो. त्या विक्रेत्याला ट्रक आयशर पिकप अशा वाहनाने मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा विक्री केल्या जातो. यानंतर सर्कल मध्ये नेमलेला गुटका होलसेल विक्रेता हा सर्कलमधील तरुण युवकांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत गाव खेडी टपऱ्या वस्त्या महत्त्वाच्या बाजारपेठ मध्ये दुचाकीवरून पोहोच विक्री केल्या जातो. यामुळे हा व्यवसाय अतिशय शिताफीने आणि साखळी पद्धतीने पोलीस प्रशासनाला संगणमत करून केला जात असल्याने या व्यवसायावर कुठेही कारवाई होताना दिसत नाहीये. या सर्व बाबींवर आता नागरिकांकडून या प्रशासनाच्या मिलीभगत वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
या गुटख्याचा होते सर्रास विक्री
हिरा ,गोवा, बाबा, आर एम डी ,राज निवास, जम्बो विमल.
गुटका विक्रीसाठी बेरोजगार तरुण करतात दुचाकीचा वापर!
होलसेल विक्रेते या तरुणांना रात्री-बेरात्री पाहिजे तेवढा गुटखा वितरित करतात आणि हे तरुण सर्रासपणे सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत या गुटक्याची विक्री बाजारपेठांमध्ये तापल्यावर गाव खेडी वस्त्यावर सर्रासपणे खुलेआम करतात. यामुळे या गुटखाबंदी ला बंदी आहे की नाही असा सवाल आता नागरिकांकडून करण्यात येत आहे, आणि कुंभकर्णी निद्रेत तील प्रशासन या गुटका व्यवसायाला कधी आळा घालणार? असा सवाल मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.