Chikhali

स्व.दादासाहेब काळमेघ यांना श्री शिवाजी महाविद्यालयात आदरांजली

चिखली (तालुका प्रतिनिधी) – श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू स्व.दादासाहेब काळमेघ यांना स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय चिखली येथे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख होते. याप्रसंगी त्यांनी तसेच प्रा. डॉ. जे. जे. जाधव यांनी स्व.दादासाहेब काळमेघ यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी महाविद्यालयातील सर्व सहकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी ही याप्रसंगी सलामी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!