pachod

दुचाकी अपघातातील जखमी महिलेचाही मृत्यू!

– तब्बल महिनाभराच्या उपचारानंतर अखेर मृत्यूने गाठलेच!
पाचोड (विजय चिडे) – धुळे – सोलापूर महामार्गावरील पाचोड येथील हॉटेल निसर्गसमोर दि.२७ जूनरोजी एका ट्रॅक्टरने दुचाकीला हुलकणी दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते. यातील मैनाबाई शिवाजी मगरे (वय ४५) रा.कोळीबोडखा ता.पैठण यांचा एका महिन्याच्या उपचारानंतर २७ जुलैरोजी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. बरोबर महिनाभरानंतर त्यांना मृत्यूने अखेर गाठले आहे.
सविस्तर असे, की पैठण तालुक्यातील कोळीबोडखा येथील शिवाजी मगरे व त्यांच्या पत्नी मैनाबाई मगरे हे दोघे दि.२७ जूनरोजी पाचोड येथून आपले खाजगी काम आटोपून त्यांच्या दुचाकी क्रमांक (एम.एच.२०.एफए.३६७७) वरून गावाकडे परत येत असताना धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल निसर्गसमोर एका ट्रॅ्क्टरने त्यांच्या दुचाकीला हुलकावणी दिली. त्यामुळे शिवाजी मगरे व मैनाबाई मगरे हे दोघेजण दुचाकीवरुन पडल्याने या अपघातात मैनाबाई शिवाजी मगरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले होते. तसेच, त्यांचे पतीही गंभीर जखमी झाल्याने स्थानिक नागरिकांनी जखमी ताबडतोब पाचोड येथील एका रुग््णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मैनाबाई मगरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु बुधवारी रात्री त्यांची एक महिन्यानंतर अखेर प्राणज्योत मालवली आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गव्हाणे यांच्यासह पोलिस नाईक पवन चव्हाण हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!