पाचोड (प्रतिनिधी) – वडिलांच्या नावावरून तीन हेक्टर शेतजमिनीपैकी एक हेक्टर जमीन पत्राआधारे मुलांच्या वाटणी पत्राआधारे नावे करण्यासाठी दहा हजाराची लाच मागणारा हर्षी (ता. पैठण) येथील तलाठी चार हजारांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
मनोजकुमार शेरखाने (रा. पडेगाव ता. जि. औरंगाबाद) असे या तलाठीचे नाव आहे. फिर्यादीची हर्षी शिवारात वडिलोपार्जित तीस एकर शेतजमीन असून वडिलांच्या नावावर असलेल्या गट क्रमांक ८४/८ मधील तीन हेक्टर शेत जमिनीपैकी एक हेक्टर जमीन वाटणी पत्रकाआधारे वडिलांच्या नावावरून वाररसाचा वाटणीपत्र फेर करण्यासाठी संमती वाटणी पत्र तयार करून नोटरी केली व गावचे तलाठी शेरखाने यांच्याकडे फेर करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी नगदी चार हजार तर वाटणी पत्र झाल्यावर तीन हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यासाठी तारीख वेळ व ठिकाण निश्चित करण्यात येऊन सापळा रचण्यात आला. बुधवारी (ता. २७) तलाठी शेरखाने यांनी तक्रारदारास पानचक्की बेगमपुरा, औरंगाबाद येथे भेटण्यासाठी बोलावले. तोच तलाठी मनोजकुमार शेरखाने यास चार हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर, पोलिस अंमलदार गजानन घायवट, गजानन कांबळे, गणेश भुजाडे, मनोहर खंडागळे, यावेळी सात हजार रुपयात प्रवीण खंदारे केली.