Chikhali

गांगलगाव पंचायत समिती गण सर्वसाधारण झाल्याने राष्ट्रवादीकडून ऋषिकेश म्हस्के दावेदार!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील गांगलगाव पंचायत समिती गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ऋषिकेश म्हस्के हे उमेदवार म्हणून इच्छुक असून, गेली कित्येक वर्षापासून राजकीय पक्ष व सामाजिक उपक्रमातून त्यांनी अनेक आंदोलने व शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम केले आहे. बुलडाणा येथील पाटबंधारे विभागावरील शेतकरी आंदोलन तर महाराष्ट्रभर गाजले होते व तसेच संजय गांधी निराधार योजना आदी विविध योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी नेहमीच अग्रेसर असलेले चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील ऋषिकेश म्हस्के हे गांगलगाव पंचायत समिती गणामधून उभे राहण्यासाठी इच्छुक असून यांना उमेदवारी देण्यासाठी अनेक गावातील राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे.
भावी पंचायत समिती सदस्य ऋषिकेश म्हस्के एक असा चेहरा की जो नेहमी गोरगरिबांच्या सुःखात दुःखात त्यांना आधार देणारा, गांगलगाव सारख्या एका छोट्याश्या गावात सामाजिक उपक्रम व संजय गांधी, श्रावण बाळ या सरकारी योजना त्याचबरोबर आतापर्यंत परिसरातील कित्येक बांधवांना सरकारी योजनांचा लाभ कोणत्याही पदावर नसताना आपल्या माध्यमातून मिळवून दिला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादीकडून ऋषिकेश म्हस्के यांचा गांगलगाव गणातील मित्र परिवारातील संपर्क तसेच नातेसंबंध, त्यांच्यावर प्रेम करणाच्या प्रत्येक घटकांचा विचार करता, त्यांना येणार्‍या पंचायत समिती मध्ये गांगलगाव गणामधून संधी दिली पाहिजे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या कामचुकार प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधामध्ये अनेक आंदोलने करून कार्यकत्यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, त्यांच्या आंदोलनांमुळे लोकांना न्यायही मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गांगलगाव पंचायत समिती गटातून म्हस्के यांची लढण्याची इच्छा असून त्यांना माजी पालकमंत्री राजेंद्रजी शिंगणे यांनी उमेदवारी द्यावी, अशी अनेक कार्यकर्त्यांनी मागणी देखील आमदार शिंगणे यांच्याकडे वेळोवेळी केली आहे. या आदी ऋषिकेश म्हस्के हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खंदे समर्थक कार्यकर्ते म्हणून काम करत होते. मात्र काही पक्ष आणि अडचणीमुळे त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये काम केले होते. मात्र त्यांचा जनते प्रति कामाचा असलेला अनुभव हा सर्वस्वी असून कोणत्याही पक्षात असले तरी शासकीय योजनेच्या माध्यमातून लोकांना फायदा होईल, असे काम नेहमी करत असतात मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा सक्रिय कार्यक्रम सुरू केले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा आहे असे पंचायत समिती इच्छुक उमेदवार ऋषिकेश म्हस्के यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!