पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, बबनराव पाचपुतेंच्या कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थकवली!
– राज्यातील सात कारखान्यांकडे तब्बल १४५०३.२९ लाख रुपयांची एफआरपी रक्कम थकलेली
पुणे (ब्रेकिंग महाराष्ट्र) – राज्यातील तब्बल सात सहकारी साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर म्हणजेच, ७० टक्के इतकीच एफआरपी देऊन शेतकर्यांचे उर्वरित पैसे थकवले आहेत. या कारखान्यांना पैसे वसुलीसाठी राज्य साखर आयुक्तालयाने वसुली नोटीस आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) बजावली आहे. या कारखान्यांत माजी मंत्री धनंजय व पंकजा मुंडे, बबनराव पाचपुते यांच्यासह कल्याणराव काळे (सोलापूर), काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे, भाजपनेते विजयकुमार दंडनाईक (उस्मानाबाद), राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील (सातारा), यांच्या कारखान्यांचा समावेश आहे.
७० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून, त्यांनी एकूण १४५०३.५९ लाख इतकी रक्कम थकवली आहे. यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आल्याचे दिसून येते. साखर आयुक्तालयाने एफआरपी वसुलीसाठी कठोर पाऊले उचलत या कारखान्यांना वसुली नोटीस बजावली असून, ही नोटीस आरआरसीनुसार बजावली गेली आहे. पैसे न भरल्यास कारखान्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई होऊ शकते. त्यामध्ये, अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई आरआरसी रक्कम ८१४.१५, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी, आरआरसीसी रक्कम – ४६१५.७५ लाख,जयलक्ष्मी शुगर प्रो.नितळी, आरआरसी रक्कम – ३४०.६९ लाख, किसनवीर ससाका भुईंज, सातारा, आरआरसी रक्कम – ४११.९१ लाख, साईकृपा साखर कारखाना, हिरडगाव, अहमदनगर – आरआरसी रक्कम -२०५४.५० लाख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर – आरआरसी रक्कम ३६७४.९० लाख, राजगड सहकारी साखर कारखाना लिं. भोर- आरआरसी रक्म २५९१.६९ लाख. या कारखान्यांचा समावेश आहे.