शिरूर अनंतपाळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; अतिवृष्टी नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या!
शिरूर अनंतपाळ, जि. लातूर (एस. आर. देशमुख) – अतिवृष्टीमुळे उगवलेली पिके पिवळे पडून सडले, तर गोगलगाय प्रादुर्भाव, अतिवृष्टीमुळे दुबार, तिबार पेरणी व तसेच वन्य प्राणी हरिण, रानडुकर या प्राण्यांनी कोवळी पीके खाऊन नष्ट केल्यामुळे मुख्य पीक सोयाबीन व खरीप हंगामातील इतर पीके व भाजीपाला यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तरी या पिकांचे सरसकट पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व तालुक्यात ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाविकास आघाडी शिरूर अनंतपाळच्यावतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. अतिवृष्टी व सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडलेले असून, शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यात अतिवृष्टीने नदी, ओढे, नाल्यांना पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तुर व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे बांध फुटीमुळे माती वाहून गेली असून, त्यात यंदा दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यात गोगलगाईचा प्रादुर्भाव व प्रमाणापेक्षा जादा पाण्यामुळे पिके पिवळी पडू लागली असल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. नुकसानग्रस्तांना आता मदतीची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख भागवत वंगे, काँग्रेस किसान सेल जिल्हाध्यक्ष संजय बिराजदार, नगरसेवक सुधीर लखनगावे, नगरसेवक संतोष शिवणे, शिरूर अनंतपाळ सोसायटीचे चेअरमन रामकिशन गड्डीमे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला, अनिल देवंगरे, अशोक कोरे, ज्ञानोबा मोगले, रमेश सोनवणे, सुचित लासूने, उस्मान मुल्ला, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब पाटील, नागनाथ सोनकांबळे, सोमेश्वर तोंडारे, फक्रोद्दीन मुजेवार, रमेश लांबोटे, शिवकुमार
तोंडोरे, गुरलिंग शिवणे, नामदेव लोखंडे, सतीश शिवणे, धोंडीराम चिंतनगीरे, बाबुराव तोरणे, अशोक गलबले, नरसिंग बंडले, निवृत्ती आटरगे, नरसिंग राजूरकर यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.