कर्जत (आशिष बाेरा) : कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजविरचित स्वरूप ज्ञानाचे रसाळ ओवी पद्धतीने विवेचन असलेल्या अध्यात्म ज्ञानदीपक ग्रंथाचे प्रकाशन आ. रोहित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सवाच्या दिवशी संपन्न झाले.
कर्जतचे कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांनी अनेक ग्रंथ लिहून ठेवले होते, यातील एक ग्रंथ अमळनेर येथील प्रा. नागनाथ रामदासी यांच्याकडे होता, त्यांनी तो पुनरलिखित केला, त्याचा अधिक प्रचार प्रसार व्हावा म्हणून आ. रोहित पवार यांनी त्याची मोठ्या प्रमाणात छपाई करून घेतली. त्याचे प्रकाशन रथोत्सवाचे दिवशी कर्जत येथील जैन स्थानकात करण्यात आले. यावेळी प्रा.नागनाथ रामदासी यांनी या ग्रंथाची अख्याईका सांगताना हा ग्रंथ महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी लिहिलेलं आहे, यामध्ये सर्व संतांचे दाखले दिलेले आहेत, स्वरूप ज्ञानाकडे नेण्याचे, अध्यात्माचे जे सार आहे असे सांगताना श्री गोदड महाराज गुरू परंपरेत जन्माला आलेले साक्षात्कारी महापुरुष या ठिकाणी होऊन गेले हे आपले भाग्य असल्याचे सांगताना त्यानी जे कार्य केले ते समाजावर मोठे ऋण आहे असे सांगत, आपले चुलत पणजोबा रामकृष्णबुवा यांना १९०६ साली परशुराम रावेरकर यांनी दिला, महाराजांच्या मंदिरातील काकडे पुजारी यांच्या तिसऱ्या पिढीतील गणोबा काकडे यांनी मूळ ग्रंथ जीर्ण झाल्याने तो खराब होऊ लागला होता, त्यामुळे तो रावेरकर यांना पुनर्लेखन करण्यासाठी दिला होता. तेव्हा पासून तो आमच्या कुटुंबात होता. २००७ साली घरातील ट्रंकेत आढळला तेव्हापासून तो प्रकाशित करण्याची इछा होती. मात्र ते झाले नाही व काही दिवसांपूर्वी आ रोहित पवार यांच्या संपर्कात आल्यानंतर हा प्रकाशित करण्याचा योग आल्याचे त्यांनी विशद केले. यासाठी अनेकांनी मदत केल्याचे सांगितले. आपली पत्नी मनीषा रामदासी यांनी संपूर्ण टाइपिंग केल्याचे म्हटले. २००९ साली राजेंद्र पवार यांना एका सद्ग्रहस्थाने तुमच्या कुटुंबाकडून संत श्री गोदड महाराजांची सेवा घडणार असल्याचे सांगितले होते. व ते २०१९ साली सत्य झाले आ. रोहित पवार याच मतदार संघाचे आमदार झाले व आमच्या कडे वर्षानुवर्षे असलेला हा ग्रंथ त्याच्या पुढाकाराने प्रकाशित झाला असे म्हटले.
यावेळी आ. रोहित पवार यानी बोलताना सांगितले की श्री गोदड महाराज भक्त निवास साठी ५ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. महाराजांनी जे ग्रंथ लिहिले आहेत ते आपल्याला जतन करायचे आहेत, ते पुनर्प्रकाशित करायचे असून ते पुढच्या पिढी पर्यत कसे जातील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. भक्तनिवसाच्या खालच्या मजल्यावर आपण एक म्युझियम करणार आहोत, यामध्ये महाराजानी वापरलेले वस्त्र, साहित्य त्यांनी लिहिलेले ग्रंथ, महाराजाचे फोटो हे ठेवायच्या असून त्या जतन करायच्या आहेत. महाराजांचा विचार जसा जास्तीत जास्त घरा पर्यत पोहचेल तसे येथे लोक येतील व मोठ्या संख्येने लोक आले तर शहराचा विकास त्यातून होनार आहे, यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपण करणार आहोत असे सांगत, याचा सर्वसामान्य लोकांना थेट फायदा होणार असल्याचे म्हटले. यावेळी हभप अमृतराव खराडे गुरुजी, मेघनाथ पाटील, नाना पाटील, पंढरीनाथ काकडे, दत्ताजी शिंदे, बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले, नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, नामदेवराव राऊत, छायाताई शेलार, भास्कर भैलूमे, संतोष मेहेत्रे, प्रतिभाताई भैलूमे, मोनाली तोटे, सुनील शेलार, आबा पाटील, तानाजी पाटील, सुनील शेलार, अभय बोरा, लालासाहेब शेळके, देविदास खरात, सतीश पाटील, रवींद्र सुपेकर, रज्जाक झारेकरी, विशाल म्हेत्रे, सुरेश खिस्ती, अमोल सोनमाळी, ऍड अशोक कोठारी, आदी सह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. चंद्रकांत राऊत यांनी केले.
श्री गोदड महाराज रथ यात्रेनिमित्त आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून चौकाचौकात विविध संतांचे कट आउट लावण्यात आले होते तर छ. शिवाजी महाराज चौकात श्री विठ्ठल रुख्मिनीची भव्य मूर्ती व संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या छोट्या मुर्त्या ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे कर्जत शहरातील वातावरण भक्तिमय होण्यात भर पडत होती.