LONAR

बिबी महावितरण कार्यालय येथे परिसरातील महिलांच्याहस्ते वृक्षारोपण

बिबी (ऋषी दंदाले) – येथील महावितरण कार्यालय येथे परिसरातील महिलांच्याहस्ते जागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

येथील ग्रामपंचायत सदस्या अनिता संजय खार्डे व परिसरातील महिला यांच्याहस्ते महावितरण कार्यालय बिबी येथे मंगळवारला वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बिबी ग्रामपंचायत सदस्य अनिता संजय खार्डे, शालिनी नागरे, लता मुंडे, सुभद्रा नागरे, सीमा वेव्हाळ, गीता खार्डे यांनी आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून निसर्गाचा समतोल टिकून राहावा व उन्हाळ्यामध्ये तापमानाची तीव्रता कमी व्हावी, या उद्देशाने सर्व महिलांनी मिळून निश्चय केला व महावितरण कार्यालय बिबी येथे एकत्र वृक्षारोपण करण्यात आले. गावातीलच नव्हे तर सर्व परिसरातील महिलांनी वृक्षारोपणाचा पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!