Chikhali

चिखली आगारात प्रवासी राजा दिन ; १६ प्रवाशांच्या तर १९ कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा

बुलढाणा/चिखली(संजय निकाळजे) – चिखली आगार विभागात काल, १९ जुलै रोजी प्रवाशी राजा दिन व पालक दिन विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांचे मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी प्रवाशांच्या १६ तर कर्मचाऱ्यांच्या १९ तक्रारीचा निपटारा करण्यात आला.

प्रवाशी राजा दिनानिमित्त प्रवाशी वर्गाकडून बसेस सुरू करणे बाबत १२, बस थांब्यावर बस थांबवीने बाबत २ , बस स्थांनाकावरील खड्ड्याबाबत १ ,नो पार्किंग झोन बाबत १ ,अशा १६ तक्रारी तर रा .प . कर्मचारी त्यांच्या तक्रारी मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था २ , चालक-वाहक विश्रांती गृहाबाबत २ , प्रसाधन गृहाच्या समस्येबाबत २ चालक-वाहक विश्रांती गृहाबाबत , प्रसाधन गृहाच्या समस्येबाबत , महिला विश्रांती व प्रसाधन गृहाबाबत , रेस्ट रूम मध्ये सतरंज्या उपलब्ध करणेबाबत , आडनावात बदल करणेबाबत , बालसंगोपण रजेबाबत , फिक्स कामगिरी मिळणेबाबत , श्रेणीकरणाबाबत:-१ अतिरिक्त वापराबाब, बढतीपरीक्षेच्या दिवशी हजेरी मिळणेबाबत ,वैद्यकीय बिलाबाबत , अलोकेशन बाबत , चालक वाहक कर्मचारी यांच्या मधून लिपीक पदात पदोन्नती बाबत ,रा प गणवेशाबाबत अशा १९ तक्रारीचा निपटारा करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थितीत बुलढाणा विभागाचे विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे , विभागीय अभियंता (स्था)), अजय नाईक, सहा वाहतुक अधीक्षक हरिष नागरे , सहा. कार्यशाळा अधीक्षक चिखली आगार सुभाष जाधव , सागर परदेशी , चिखली आगार वरिष्ठ लिपिक सौ सपना मगर, स्वप्नील गाडेकर वरिष्ठ लिपिक व इतर समस्त कर्मचारी व प्रवाशी यांचे समक्ष प्रवाशी राजा दिन व पालक कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी विभाग नियंत्रक यांनी प्रवाशी वर्गाचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!