शेवगाव-पाथर्डीच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रतापकाकांना विधानसभेत पाठवा!
– अॅड. प्रतापकाका ढाकणे यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा
– गायक आनंद शिंदे यांच्या ‘शिंदेशाही’ कार्यक्रमाला श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडेकर) – येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शंभर टक्के येणार असल्याने ज्याप्रमाणे मला खासदार केले, त्याप्रमाणे प्रतापरावांना विधानसभेत पाठवा, असे अहवान खा. नीलेश लंके यांनी केले आहे. शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. खंडोबा मैदानावर झालेल्या कार्यक्रमास अॅड. प्रतापराव ढाकणे, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अॅड. दिनकरराव पालवे, शिवसेना (ठाकरे) नेते रामदास गोल्हार, राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगाव तालुका अध्यक्ष हरीश भारदे, राहुल राजळे, बंडू बोरुडे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, शेवगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, माजी उपसरपंच एजाज काझी, राहुल मगरे, माधव काटे, प्रकाश घनवट, शिवसेनेचे एकनाथ कुसाळकर, अशोक धनवडे, अमर पुरनाळे, आखेगावचे सरपंच शंकर काटे, यांच्यासह शेवगाव पाथर्डी तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते.
अभीष्टचिंतन सोहळ्यात बोलताना खा.नीलेश लंके म्हणाले, की प्रतापकाका सरळ आणि प्रामाणिकपणे साथ देणारा अत्यंत प्रेमळ साधा माणूस आहे. कोणाशी कधी गद्दारी करणारा नाही. अत्यंत कमी बोलणारा, पक्का माणूस आहे. दोनदा पराजय झाला तरी सामांन्यांशी नाळ तोडली नाही, पण त्यांना होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रामाणिक व खंभीरपणे साथ द्या. त्यांना फसवू नका, आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत जिद्दीने आतापासून लढाई जिंकण्यासाठी तयारीला लागावे, मला तुम्ही खासदार करून दिल्लीत पाठवले आहे. त्याप्रमाणे विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रतापकाकाला विधानसभेत पाठवा. शेवगाव शहराचा पिण्याचा पाणी प्रश्न, ताजनापूर लिप्ट योजनासह शेवगाव मतदार संघातील प्रलंबित असलेले रस्ते आदी विविध प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून, मला मतदारसंघांतील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जोडीला हक्काचा माणूस द्या. आम्ही दोघं सोबत राहिल्यास पाच वर्षात मतदारसघांचा अनुशेष भरून काढून चेहरामोहरा बदलून टाकू, त्यासाठी जागृत राहून विधानसभा जिंकण्यासाठी सर्वांनी जिद्दीने आतापासून निर्धार करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन खा. लंके यांनी केले. अभीष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना प्रतापराव ढाकणे म्हणाले, आज मला वडील बबनराव ढाकणे यांची दिवसभर आठवण येत होती, पण ती उणीव खा.नीलेश लंके यांनी वडील, भाऊ म्हणून आधार दिला, असे सांगून ते भावनाविवश झाले. नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देवून लोकसभा लढविली गेली, यश मिळाले पण मात्र पराभव झाला असता, तर आज ते फिरलेही नसते. आज जिल्ह्यात प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य माणसाला साथ देवून, समाजासाठी लढा कायम ठेवून, सर्वांना बरोबर घेवून, काम केलं ते भविष्यातही करू. मला आज पर्यंत जे प्रेम दिलं, तेच विधानसभा निवडणुकीत द्यावे. निस्वार्थीपणे काम करू, असे प्रतापकाका ढाकणे यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त केक कापून, पुष्पहार घालून खा. लंके यांनी ढाकणे दांपत्याचा सत्कार केला. तसेच गायक आनंद शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. अभीष्टचिंतन सोहळ्यानंतर अॅड. प्रताप ढाकणे यांच्यावरील गायक मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या गीताचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी अॅड. प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर आनंद शिंदे आणि सहकार्यांचा ‘शिंदेशाही’ हा लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमास शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील सर्व श्रोते, महिला, पुरुष, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माधव काटे यांनी प्रास्ताविक केले. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश ढाकणे यांनी आभार मानले
दिनकरराव पालवेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
पाथर्डीचे माजी उपनगराध्यक्ष अॅड.दिनकरराव पालवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल खा. नीलेश लंके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.