BuldanaBULDHANAHead linesVidharbha
संपाचा विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका; विविध दाखले अडकले सह्यांच्या कचाट्यात; प्रवेशही रखडले!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाचा आता विद्यार्थ्यांनाही फटका बसत असून, विविध दाखले सह्यांअभावी पडून आहेत. त्यामुळे काहींची प्रवेश प्रक्रियादेखील रखडली आहे. सदर संपावर तोडगा काढावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्री शेळके यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे काल, दि. १९ जुलै रोजी केली आहे.
याबाबत काल १९ जुलै मुंबई येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व गटनेते बाळासाहेब थोरात यांना भेटून निवेदन दिले. सदर निवेदनात नमूद केले की, राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा विविध मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. सदर संपाचा लाडक्या बहिणीला तर फटका बसतच असून, आता या संपामुळे विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्रसह विविध दाखले सह्यांच्या अभावी पडून आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राखडली असून, शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक कामेही थांबली आहेत. तरी सदर महसूल कर्मचार्यांच्या संपावर तातडीने तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही शेवटी निवेदनात केली आहे.