– मोदी सरकारने बौद्ध धम्माचा अवमान केल्याचा आरोप
मेरा बु ता. चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) : शांततेचे प्रतीक असलेला अशोक स्तंभाचे आक्रमक रूप दाखवून विटंबना केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला. या विरोधात पदाधिकार्यांनी २२ जुलै रोजी चिखली तहसीलदार यांना निवेदन दिले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक ११ जुलै रोजी संसद भवनाच्या छतावर अशोक स्तंभाचे अनावरण केले.
मोदी सरकारने अशोक स्तंभाची विटंबना केली आहे. यात सिंहाचे स्वरूप बदलून आक्रमक दाखवल्याने बौद्ध धम्माचा अवमान केला आहे. अशोक सम्राट यांनी युद्ध सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता. अशोक स्तंभ हा शांततेचे राष्ट्र चिन्ह असून, आक्रमक स्वरूपात दाखवल्याने बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हा देशवासीयांचा अवमान आहे, तसेच हे भारतीय लोकशाही संपवण्याचा षडयंत्र आहे. याचा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. तर मोदी सरकारने जे आक्रमक अशोक स्तंभ संसद भवन परिसरात बसवला आहे तो त्वरित काढण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा भर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई यांनी दिला आहे. जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, सुरेशभाऊ इंगळे, चिखली तालुका अध्यक्ष श्याम लहाने, चिखली शहराध्यक्ष सुनील सोळंके, सतीश पवार, वसीम भाई, सागर जाधव, अरुण जाधव, दीपक तायडे, शेख दानिश, यश बावस्कर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.
Leave a Reply