– अंकुश थुट्टे यांची बीडीओकडे तक्रार
मेरा बु , ता. चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – येथून जवळच असलेल्या भरोसा येथील मुख्य रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार अंकुश थुट्टे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे २० जुलै रोजी केली आहे.
या तक्रारी मध्ये म्हटले की, भरोसा गावातील मुख्यरस्त्यावर मराठी पूर्व माध्यमिक शाळा असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींना याच रस्त्यावरुन शाळेत जावे लागते. अनेकवेळा वयोवृद्ध या रस्त्यावर जा ये करताना पडलेले आहेत. शेताकडे जाणारा गावातील मुख्य रस्ता असल्याने शेतकरी, शेतमजूर तसेच आंचरवाडी, वसंतनगर जाणारी बहुसंख्य मंडळींना जीवमुठीत धरुन त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे, याचा नागरिक व विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी, अंकुश थुट्टे यांनी केलेली आहे.
Leave a Reply