बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र):- लोकशाही मुल्ये व संविधानाला धाब्यावर बसवून केंद्रातील मोदी सरकारचा हुकूमशाही कारभार सुरु असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी व त्यांचा छळ करण्यासाठी या यंत्रणांचा गैरवापर सर्रास केला जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीमार्फत होत असलेली चौकशी हा सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे, सोनिया गांधी यांची ईडीकडून केली जात असलेली चौकशी केंद्रातील मोदी सरकारच्या इशारयावरुन केली जात आहे. २०१५ साली मोदी सरकारनेच नॅशनल हेराल्ड प्रकरण काही तथ्य नसल्याने बंद केले होते. परंतु महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी, राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने ईडीच्या माध्यमातून गांधी कुटुंबाला त्रास दिला जात आहे. काँग्रेस पक्ष अशा हुकूमशाहीसमोर झुकत नाही तर त्याविरोधात आरपारची लढाई लढेल असा इशारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आ.राहुल बोंद्रे यांनी दिला.
केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना बोंद्रे म्हणाले की, केंद्र सरकार विरोधात जनतेत प्रचंड आक्रोश आहे. मोदी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. विरोधकांना नाहक त्रास देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राने स्वातंत्र्य चळवळीत इंग्रज सत्तेविरोधात आवाज उठवलेला आहे. आणि ज्यांचा स्वातंत्र्यचळवळीत काहीही संबंध नाही हे लोक आज देश विकून देश चालवत आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. परंतु काँग्रेस पक्ष भाजपा व मोदी सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नसून आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देऊ असेही ते म्हणाले. यावेळी बंद करा बंद करा तपास यंत्रणांचा गैरवापर बंद करा, नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, संविधान विरोधी मोदी सरकार चा धिक्कार खुप झाली दडपशाही देशात हवी लोकशाही, अशा आक्रमक घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दणाणून गेला होता.
यावेळी हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, शामभाउ उमाळकर, लक्ष्मणराव घुमरे, स्वातीताई वाकेकर, अॅड.जयश्रीताई शेळके, बाबासाहेब भोंडे, बादशाह खान, अॅड.अनंतराव वानखडे, भाई प्रदीप अंभोरे, मीनाताई सातव, संगीताताई गाडेकर, मिनलताई आंबेकर, डॉ.सदानंद धनोकार, भगवान धांडे, गजानन मामलकर, अॅड.ज्योतीताई ढोकणे, अॅड. मोहतेश्याम रजा, चित्रांगण खंडारे, अशोकराव पडघान, रोहीत गवळी, पंकज हजारी, प्रा.गजानन खरात, रवि पाटील आदींची प्रमुख मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी जिल्हाधिकारयांमार्फत महामहीम राष्ट्रपती महोदय यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनावर राहुल बोंद्रे, माजी आ.हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर, अॅड. जयश्रीताई शेळके, हाजी जाहीद अली खान, लक्ष्मणराव घुमरे, प्रकाश पाटील, कैलास सुखदाने, मिनल आंबेकर, रवी पाटील, सतिष मेहेंद्रे, डॉ.इसरार जमादार, जेष्ठ काँग्रेस नेते मुखत्यारसिंग राजपुत, गणेश उचाडे पाटील, साहेबराव मोरे, इरफान पठाण, साहेबराव पाटोळे, विष्णू पाटील कुळसुंदर, अॅड.विजय सावळे, अॅड.शरद राखोंडे, अॅड.जावेद कुरेशी, दिपक देशमाने, जाकीर कुरेशी, मोहतेश्याम रजा, समाधान सुपेकर, देवानंद पवार, पंकज हजारी, राजेश मापारी, गजानन खरात, शिवदास रिंढे, सिध्दार्थ जाधव, दिलीप सानप, विजय काटोले, डॉ. सदानंद धनोकार, मनोज वानखडे, रमेश कायंदे, अनिल सावजी, सुनिल तायडे, दत्ता काकस, भगवान धांडे, राजेंद्र वाडेकर, निलेश पाउलझगरे, प्रकाश देशमुख, तेजराव मारोडे, संतोष राजनकर, मीनाताई सातव, ज्योतीताई ढोकणे, नंदिनी टारपे, प्रमिला गवई, संगीताताई पवार, अनिता घुगे, विद्या देशमाने, उषाताई चाटे, दिपक रिंढे, लक्ष्मण भिसे आदींची स्वाक्षरी आहे सूत्रसंचालन शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी तर आभार प्रदर्शन प्रा सुनिल सपकाळ यांनी केले.