बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) : जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आला आहे. वरली मटका, दारू विक्री, जुगार यासह विनापरवाना शस्त्रास्त्र बाळगणे , असे प्रकार होत आहे. या कडे पोलीस दुर्लक्ष होत आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनापरवा तलवार बाळगणाणारया दोघांना पोलिसांनी पकडून त्यांच्या जवळून तलवार जप्त करण्यात आली. सदर कारवाई चिखली शहरातील पुंडलिक नगर व उमरा खामगाव तालुक्यातील उमरा येथे करण्यात आली.
चिखली- शहरातील पुंडलीक नगर येथील यश अजय गाडेकर हा विनापरवाना तलवार बाळगून फिरत असल्याची गुप्त माहिती पिएसआय व पथकाला मिळाली यावरून ठाणेदार अशोक लांडे, ठाणेदार यांचे मार्गदर्शनात डि.बी.पथकाचे पिएसआय धनंजय इंगळे व पथकाने पुंडलीक नगर येथील यश अजय गाडेकर यास ताब्यात घेवून त्याचे कडुन एक ३२ इंच लांबीची एक तलवार ज्याची किमंत अंदाजे ६०० रूपयाची जप्त करून त्याच्याविरुद चिखली पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर पोलीस अधिक्षक श्रावण दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे नेतृत्वात डि.बी.पथकाचे पोउपनि धनंजय इंगळे, पोहेकॉ अताउल्ला खान, सुधाकर पाडळे, रामेश्वर भांडेकर, निलेश सावळे, प्रमोद साळवे, राहुल पायघन, आशा मोरे यांनी केली आहे.
पिंपळगाव राजा- खामगाव तालुक्यातील उमरा येथील बाजीराव कौतीकराव लांडे वय ४५ हा हातात लोखंडी तलवार घेऊन गावात धुमाकूळ घालून गावकरयांना वेठीस धरत धमक्या देत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार सतीश आडे यांना मिळाली. या माहितीवरुन ठाणेदार आडे यांनी पथकासह २२ जुलै रोजी उमरा येथे जावून बाजीराव कौतीकराव लांडे यास ताब्यात घेऊन त्त्याच्याजवळून एक तलवार व दुचाकी असा ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. व त्याच्याविरुध्द पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यसात आला. सदर कारवाई ठाणेदार आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली.