साखरखेर्डा (प्रतिनिधी) – दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मेहकर येथील श्री संत बाळाभाऊ महाराज पितळे दिंडीचे स्वागत साखरखेर्डा नगरीत मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. गुरुवारला मेहकर येथून साखरखेर्डा येथे पितळे महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. श्रीराम मंदीरात दिंडीचे आगमन होताच अनेक भाविकांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला.
श्रीराम मंदीरात प . पु प्रल्हाद महाराज उपासना मंडळाच्यावतीने वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. वट सावित्री पोर्णिमेच्या दिवशी इंगळे कुटुंबाच्यावतीने संत संताजी जगनाडे महाराज नगरात पाद्य पुजन करण्यात आले. श्रीराम मंदीरापासून श्री शिवाजी व्यायाम शाळेपर्यंत गजानन इंगळे यांनी पादुका घेऊन टाळमृदंकाच्या गजरात विठ्ठलाचे नामस्मरण करीत आणल्या. तेथे पुजन व आरती करण्यात आली. तेथून दिलीप इंगळे यांच्या निवासस्थानी पादुका पूजन करण्यात आले, आणि सर्व वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. गेली ४० वर्षांपासून इंगळे परिवाराच्यावतीने नियमित सेवा समर्पित केली जाते. तेथून दिंडी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली. यावेळी साखरखेर्डा , गोरेगाव , बाळसमुंद्र येथेही चहा , पाणी , फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.