CrimeMEHAKAR

पोलिस भरतीमध्ये लढवली शक्कल; बनावट प्रमाणपत्राची उघड झाली नक्कल!

– पोलीस भरतीमध्ये कागदपत्र पडताळणीत प्रकरण उघडकीस

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – बनावट नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र देऊन पोलिस भरतीत आलेल्या तरूणाचा खोटारडेपणा अखेर उघडकीस आला आहे. कागदपत्रे पडताळणीत त्याचा कारनामा उघड झाला. मेहकर नायब तहसीलदार यांच्या फिर्यादीनुसार, बनावट नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र तयार करून फसवणूक करणार्‍या या तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना काल दि. १८ जूनरोजी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मेहकर येथील रहिवासी असलेल्या गजानन गोपाळा गोफणे, रा. शिवाजी नगर, मेहकर या युवकाने १० मार्च २०२२ रोजी त्याच्याजवळ नॉन क्रिमिलअर प्रमाणपत्र बनवून घेण्यासाठी आलेल्या युवकाला बनावट नॉन क्रिमिलअर प्रमाणपत्र बनवून दिले. त्या प्रकरणी पडताळणी केल्यावर ते सर्टिफिकेट बनावट असल्याचे दिसून आल्याने गजानन गोफणेविरुद्ध मेहकर पोलीस स्टेशनला कौतिकराव विष्णाजी रावळकर, नायब तहसीलदार यांनी फिर्याद दिली असता, भारतीय दंडविधानाच्या ४२०, ४६५, ४६८ कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

असे आले प्रकरण उघडकीस…!

मेहकर तहसील अंतर्गत येणार्‍या एका गावातील युवकाची पोलीस भरतीमध्ये निवड झाली. त्या युवकाचे कागदपत्र पडताळणीसाठी घेण्यात आले होते. त्याच्या नॉन क्रिमिलअर प्रमाणपत्राची ऑनलाईन पडताळणी केली असता, ते प्रमाणपत्र कुठेच दिसत नव्हते. अशात त्या युवकाच्या कागदपत्राची पडताळणी ही मेहकर तहसीलकडून होत असतांना कोठे कागदपत्र तयार केले, याची विचारपूस केली असता, नॉन क्रिमिलअर सर्टिफिकेट बनवून घेणार्‍या युवकाने संबंधित गजानन गोफणे याचे नाव घेतले. गोफणे याची चौकशी केली असता, गोफणे यानेसुद्धा कबुल केले, की त्याने बनावट सर्टिफिकेट बनवून दिले. ज्यावर टाकण्यात आलेला नंबर हा एका अंकाने कमी असल्याने तो कोठेच ट्रेस होत नव्हता. दरम्यान, या आरोपीचा हिवरा आश्रम येथील सेतु सुविधा केंद्राशी काहीही संबंध नसल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!