चिखली (महेंद्र हिवाळे) – एकदा मोबाईल चोरीला गेला की तो परत कधीच मिळत नाही. पण चिखली पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून तब्बल २ लाख १६ हजार रूपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले. तसेच, हे एकूण १८ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले. आपला मोबाईल परत मिळाल्याचे पाहून या महिला-पुरूषांच्या चेहर्यावर हसू फुलले होते. चिखली पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चिखली पोलिसांत मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारअर्जावरून बुलढाणा सायबर पोलिसांच्या मदतीने व ‘आयएमईआय’ नंबरवरून संबंधित मोबाईलचा शोध घेऊन १८ मोबाईल हस्तगत केले होते. अनेक कंपन्यांचे मोबाइल होते व त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख १६ हजार एवढी आहे. हस्तगत केलेले मोबाईल नागरिकांना परत मिळाले. ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात डी. बी. पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान, महिला पोलिस कॉन्स्टेबल रुपाली उगले, पंढरीनाथ मिसाळ, माया सोनुने, अमोल गवई, राजेश मापारी, रोहिदास पांढरे, प्रशांत धंदर, नीलेश सावळे, सागर कोल्हे, राहुल पायघन तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलासकुमार सानप यांनी केली होती.
————–