BuldanaBULDHANAHead linesVidharbha

लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल २९ अर्ज दाखल; जिल्हावासीयांचे आता माघारीकडे लक्ष!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण २९ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, आज (दि.४) सर्वाधिक १७ उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सादर केले. आज नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर यांच्यासह एकूण १७ उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले होते. दाखल करण्यात आलेल्या सर्व २९ नामनिर्देशन पत्रांची शुक्रवारी, दि. ५ एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, दि. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

आज बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी ५ जणांनी ५ अर्जाची उचल केली होती. दरम्यान आज १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत ६२ जणांनी १३७ अर्जाची उचल केली होती. यातील २९ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आज गजानन जर्नादन धांडे – अपक्ष, नरेंद्र दगडू खेडेकर – शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम पाटील – अपक्ष, सचिंद्र शेषराव मघाडे – सोशालिस्ट पार्टी इंडिया, दीपक भानुदास जाधव पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटीक, शाम बन्सीलाल शर्मा – अपक्ष, अशोक वामन हिवाळे – अपक्ष, नामदेव दगडू राठोड – अपक्ष, वसंत राजाराम मगर – वंचित बहुजन आघाडी, संतोष भीमराव इंगळे- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, दिनकर तुमाकार संबारे – अपक्ष, विकास प्रकाश नांदवे – भीमसेना, बाळासाहेब रामचंद्र इंगळे – बहुजन संघर्ष सेना, गौतम किसनराव मघाडे – बसपा, विलास शंकर तायडे – बहुजन समाज पार्टी, अ‍ॅड. सैयद मुबीन सैय्यद नईम – अपक्ष, माधवराव सखाराम बनसोडे बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.
याआधी संजय रामभाऊ गायकवाड – शिवसेना (शिंदे गट), विजयराज शिंदे – भाजप, प्रतापराव जाधव – शिवसेना (शिंदे गट), रविकांत चंद्रदास तुपकर – अपक्ष, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील – बहुजन मुक्ती पक्ष, महंमद हसन इनामदार – मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टी, सुमन मधुकर तिरपुडे – पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, संदीप रामराव शेळके – अपक्ष, नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. २८ मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. आज इच्छुकांनी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज सादर केले.


लोकसभा निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल, थेट तक्रार दाखल करता येणार!

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने तीनही निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून पी. जे. भागदेव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्क क्रमांक ९९७८४०७९५० असून सर्कीट हाऊसमधील जिजाऊ कक्षामध्ये त्यांचे वास्तव्य आहे. निवडणूक कायदा व सुव्यवस्थेसाठी निरीक्षक म्हणून सेंथिल कृषन्न यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९४११११२७९२, ९६३९१४६०६६ असून सर्कीट हाऊस मधील अजिंठा कक्षात त्यांचे वास्तव्य आहे. निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून अमित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८८११००७८७२ असा आहे. त्यांचे वास्तव हे सर्कीट हाऊसमधील सावित्री कक्षात आहे. निवडणूक विषयक तक्रारी किंवा समस्यांबाबत तीनही निरीक्षकांकडे म्हणणे मांडता येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या निवडणूक विषयक तक्रारी किंवा सूचना असल्यास निरीक्षकांकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
————–

प्रा. नरेंद्र खेडेकरांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!