BuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha
प्रा. नरेंद्र खेडेकरांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी आज (दि.४) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाआघाडीचे सर्व नेते हजर होते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीनवाजेपर्यंतची डेडलाईन होती. त्यामुळे सकाळीच खेडेकर यांनी अर्ज दाखल करत, त्यानंतर रॅली व जाहीरसभा घेतली. या सभेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गद्दाराला गाडण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे प्रा. खेडेकरांनी नीक्षून सांगितले. तर गद्दारांवर यावेळी आदित्य ठाकरेंनी जोरदार आसूड ओढले.
प्रा. नरेंद्र खेडेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले तेव्हा त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेते प्रा. सुषमा अंधारे, रोहित पवार, जयश्री शेळके, आ. राजेश एकडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नरेंद्र खेडेकर हे शेगावला जाऊन त्यांनी सपत्नीक संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले व या लढाईसाठी बळ देण्याचे साकडे घातले.
लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल २९ अर्ज दाखल; जिल्हावासीयांचे आता माघारीकडे लक्ष!