पाचोड (विजय चिडे) : चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या एका टिप्परला हिरडपुरी ते विहामांडवा रस्तावर महसुलच्या पथकांने आज (दि.१८) पाहटे चारच्या दरम्यान ताब्यात घेतले असून, अंदाजे दोन ब्रास वाळूने भरलेला टिप्पर जप्त केला आहे.
उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री स्वप्नील मोरे तसेच तहसीलदार पैठण दत्ता निलावाड यांचे आदेशानुसार, पैठण तालुक्यात गौण खनिज पथक कार्यान्वित केले आहे, त्यानुसार गौण खनिज पथक प्रमुख मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, तलाठी भारत सवने, तलाठी आकाश गाडगे, तलाठी राम केंद्रे, तसेच कोतवाल दीपक नवगिरे, कोतवाल अनिल घोडके, शासकीय वाहनचालक भारत धारकर यांच्या पथकाने सोमवारी पाहटे दि.18 रोजी सकाळी अंदाजे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास हिरडपुरी ते विहामांडवा रोडवर अंदाजे दोन ब्रास वाळू असलेला टिप्पर हा अनधिकृत वाळू वाहतूक करताना पाठलाग करून अडवला, व रॉयल्टी संदर्भात विचारणा केली असता , वाहन चालकाकडे रॉयल्टी नसल्याने सदर वाळू ही अनधिकृत वाहतूक करीत असताना आढळून आल्याने सदर टिप्पर (त्यावरील क्रमांक खोडलेला दिसून आला) हा टिप्पर जप्त करण्यात येऊन पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय पैठण येथे लावण्यात आला.