आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग लोहगाव व डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर कोयाळी तर्फे चाकण गावातील स्नेहवन संस्थेत विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडले. यास युवक – तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. या शिबिराचे उद्घाटन स्नेहवन संस्थेचे संस्थापक तथा संचालक अशोक देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास विभाग अधिकारी पल्लवी मुळे, शालेय पोषण अधिकारी मोहन मुळे आदी उपस्थित होते.
शिबिरात युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास अंतर्गत स्नेहवन परिसर स्वच्छता अभियान, स्मशानभूमी परिसर स्वच्छता अभियान, खंडोबा टेकडी स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाडळे दिघे वस्ती स्वच्छता अभियान, नदी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, सांडपाण्याची व्यवस्था, बायोगॅस प्रकल्प, रोपवाटिका कार्यशाळा, लोकसंख्या जनजागृती अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती अभियान, हुंडा पद्धती प्रतिबंध जनजागृती अभियान, निसर्ग संवर्धन अभियान, भित्तीचित्रण द्वारे जनजागृती अभियान, प्रभात फेरी द्वारे जनजागृती, सर्व शिक्षा अभियान आदी उपक्रम राबविण्यात आले. शिबिर कालावधीत अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ कमलजीत कौर यांनी व्यक्तिमत्व विकास, मॉडर्न औषध शास्त्र महाविद्यालयातील प्रा श्री रोहित गुरव यांनी प्रेम मैत्री व आई- बाबा, मा श्री अमित जी हरहरे यांनी भारतीय संस्कृती ची ओळख, ए आय एस एस एम एस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना पुणे जिल्हा समन्वयक डॉ नाना शेजवळ यांनी युवा विकासात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची भूमिका, जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी जलसंवर्धन अभियान यावर प्रबोधनपर व्याख्याने उत्साहात झाली.
यावेळी माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील उपस्थित होते. शिबिर कालावधीत अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा भाग्यश्री ढाकूलकर, डॉ सानिया अन्सारी, डॉ पंकज आगरकर, डॉ नागेश शेळके, श्री गोरखनाथ देशमुख व महाविद्यालयातील सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदींनी शिबिर स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थी स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ फारुख सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा समारोप झाला. शिबिर कालावधीत समाजपयोगी व नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविल्याबद्दल अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सल्लागार डॉ सुशांत पाटील व उपाध्यक्ष डॉ एकनाथ खेडकर, कोयाळी तर्फे चाकण गावचे सरपंच अजय टेंगले आदींनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले. सदर शिबिर यशस्वीतेस रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा दिलीप घुले, अशोक देशमाने , शिक्षक प्रतिनिधी प्रा अश्विनी वाघुले, प्रा श्रद्धा खंदारे, प्रा अमृता मोरे, प्रा सीमा दरेकर, विद्यार्थी प्रतिनिधी दिनेश नगरे, महेश गिरी, सनी पाटील,आदित्य कोनकेवाढ, प्रतीक चौधरी, यशराज, सुजन, अथर्व, तनिष्का, प्रसन्ना, शिवम फुलवळे, उज्मा, गायत्री, ओम प्रकाश, गणेश जाधव आदींनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.