– संग्रामपूर येथे हेल्पलाईन सेंटरचे उद्घाटन; हेल्पलाईन सेंटर जनतेसाठी आधार केंद्र ठरेल – रविकांत तुपकर
संग्रामपूर (तालुका प्रतिनिधी)) – शेतकरी रविकांत नेते रविकांत तुपकरांनी निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून संग्रामपूर तालुक्यातील गावागावात जात नागरिकांशी संवाद साधला, थेट नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली व गावकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यांच्या यात्रेला गावागावात जोरदार प्रतिसाद मिळाल्याने तालुकाभर या यात्रेचा जोरदार आवाज घुमला. तर संग्रामपूर येथे तहसील कार्यालयाजवळ रविकांत तुपकरांच्या जनसंपर्क कार्यालय व हेल्पलाईन सेंटर उद्घाटन करण्यात आले. हे हेल्पलाईन सेंटर तालुक्यातील जनतेसाठी एक आधाराचे ठिकाण बनेल असा, असा विश्वास यावेळी रविकांत तुपकरांनी व्यक्त केला. घाटाखाली पहिल्यांदाच तुपकरांचे जनसंपर्क कार्यालय व हेल्पलाईन सेंटर सुरू झालेले आहे.
निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून २५ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यातील शेतखेड, करमोडा, मारोड, धामणगाव गोतमारे, झाशी, मनार्डी, जस्तगाव, काकोडा, निवाना, चांगेफळ खुर्द., आकोली, रुधाना, वकाना या गावांमध्ये ॲड. शर्वरी तुपकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, तर तर पेसोडा व कवठळ येथील सभांना रविकांत तुपकरांनी संबोधित केले. त्याचबरोबर २६ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील हिंगणा, वरवट खंडेराव, पातृर्डा बु., आवार, उकळी बु., पिप्री अडगाव, कोलद, पडसोडा, एकलारा, वानखेड या गावांमध्ये जात रविकांत तुपकरांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तुपकरांच्या या यात्रेला गावागावात जोरदार प्रतिसाद मिळाला. तर २६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाजवळील परिसरात रविकांत तुपकरांच्या जनसंपर्क कार्यालय व हेल्पलाईन सेंटरचे उद्घाटन भाऊ भोजने व अभयसिंग मारोडे यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. हे प्रशस्त आणि सुसज्ज कार्यालय लोकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आले आहे. माझे सर्व सहकारी जनसामान्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून कटिबद्ध राहतील व जनसामान्यांना याचा निश्चित आधार होईल, असा विश्वास रविकांत तुपकरांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कृष्णा पवार, अनंता मानकर, अक्षय पाटील-भालतडक, अस्लम शेख, सुनील अस्वार, दीपक पाटील, वैभव जाणे, सदाशिव जाणे, श्रीकृष्ण पाटील, अनिलसिंग चव्हाण, विठ्ठल निंभोळकर, निखिल पाटील, अमोल ठाकरे, अमोल मोहोड, गजानन रावणकार, श्रीकृष्ण मसुरकर, हमीद पाशा, रवी शिरस्कार, गणेश टापरे, गणेश मानखेर, सुमित ढोसे, शेख साबीर, प्रणव पाटील, सौरभ बावस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.