पाचोड (विजय चिडे) – पैठण तालुक्यातिल लिबगाव येथे गल्ली-गल्लीत चिखल तयार झाला असून येथील नागरिकांना चिखलामूळे घराबाहेर पडणे मुश्किल झाले असल्यामुळे सध्या गावात काय ते गटारे, काय ती समस्या, काय ते गाव, काय तो रस्ता आणि काय ती लिबगाव ग्रामपंचायत, काय ती लिबगावकरांची हाल सर्व ओके अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील सांडपाणी जाण्यासाठी गटारींची व्यवस्था नाही. रस्त्यांवर इतरत्र सांडपाणी सोडले जाते, परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने बहुतेक ठिकाणी डबके साचून डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
गावामध्ये अंतर्गत रस्त्यावरून चालत येत नाही असे चित्र सध्या लिबगावात पहावयास मिळत आहेत. सध्या गावातील ग्रामसेवक, सरपंच यांचे दुर्लक्षामुळे आता ग्रामस्थांवर काय ते गाव काय ते गटार काय तो रस्ता काय त्या नेहमीच्या कायम असलेल्या समस्या सर्व ओके आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. शासनाच्या वित्त आयोगाचे लाखो रुपये खर्च होऊन आजच्या लिबगावात गटारांचे साम्राज निर्माण झाले आहे. गावातील अंतर्गत रस्ते पार करताना गावकऱ्यांना करत करावी लागत आहे.गावातील रस्त्यावर ठिकठिकाणी गटारे साचली आहेत. लहान मुलांना शाळेकडे, शेतकरी व महिलांना शेताकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे गावकरी तसेच शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणीं दुचाकी पडून अनेकांचे किरकोळ अपघात घडत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणीं गटारे साचली असल्याने डासांचा प्रादुर्भाव होऊन आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे . या बाबत ग्रामपंचायत प्रशासन सुस्त असून १५ व्या वित्त आयोगाचा लाखो रुपये निधी गावात खर्च होत असताना ह्या असुविधा कश्या असा प्रश्न गावकऱ्यांनी निर्माण केला लागले आहे.गावात कुठेही सांडपाण्यासाठी गटारींची व्यवस्था नसल्याने नाईलाजास्तव भांडी धुण्याचे पाणी नागरिक रस्त्यावर सोडतात. मात्र निचरा होण्यासाठीही जागा नसल्याने संबंध गल्लीत कुठेही डबक्यांमध्ये हे गटारीचे पाणी साचलेले दिसते. त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ गावातील सांडपाण्याची व्यवस्था करावी, नागरिकांच्या भावनांचा अंत पाहू नये, असे नागरिकांतून बोले जात आहे.
ग्रामपंचायतचे गावात स्वच्छता ठेवण्याचे कर्तव्य आहे. मात्र तसले कुठलेही लक्ष दिले जात नाही. संपूर्ण रस्त्यांवर गटारींचेच साम्राज्य असल्याने नागरिकांना नाक दाबून गावात चलावावे लागते. ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करून या गटारी प्रवाही कराव्या. त्याचबरोबर या गावात स्वच्छता मोहीम राबवावी. गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांची नुसते उंटावरून शेळ्या न हाकलता गावातील चिखलाचे नियोजन कराला पाहिजे, गावातील प्रत्येक रस्ता चिखलमय झाले आहेत. ग्रापंचायतीने याकडे लक्ष देईला पाहीजे.
– मदन निर्मळ, रा.लिबगाव नागरिक