Marathwada

भोकरसह तीन तालुक्यांचा पाणीप्रश्न मिटणार; ७२९ कोटींच्या योजनेला मान्यता!

– भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यातील पाणी योजना मार्गी लागणार
– वीजबिल भरण्याचे झंजट नाही, सोलर सिस्टिमवर चालणार योजना

भोकर, जि. नांदेड (हनुमान डाके) – भोकर तालुक्यातील सिंचन मोठ्याप्रमाणात नसल्याने अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत होती. या समस्या मागील अनेक वर्षांपासून आहे. सदरील या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तालुका पातळीवर या संदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिली असून, त्यानुसार, ७२८.९० कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भोकर तालुक्याचा दुष्काळी हा शिक्का पुसण्यास मदत होणार आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघात अंतर्गत असलेल्या तालुके भोकर, अर्धापूर, मुदखेड या तालुक्यातील १८३ या गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, यासाठी शासनाने तब्बल ७२८कोटी ९० लक्ष रुपयांच्या अंदाज पत्रकास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील वीज पुरवठा आणि अडचणी लक्षात घेऊन आणि विद्युत बिल न भरल्यामुळे काही काळ पाणीपुरवठा बंद पडतात. यासाठी योजनेत सोलार सिस्टीम अंतर्भूत करण्यात असल्यामुळे भविष्यात महावितरणचे विद्युत बिल भरण्याची गरज भासणार नाही.
भोकर तालुक्यातील पिंपळडोह, किनी, पाळज, भोसी, सोमढाणा, आमदरी, थेरबन, दिवशी, हस्सापूर, देवढाणा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या निधीमुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटणार आहे. सदरील गावातील पाणीपुरवठा योजनांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे आता ही कामे लवकरच सुरू होतील, असा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!