Breaking newsKhandesh

अस्वल दर्शन : देव मोगरा मंदिर व धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांना सावधतेचा इशारा

नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र):- जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात १५ जुलै रोजी सायंकाळी स्थानिकांना एका अस्वलाचे दर्शन झाले आहे. सरी दहेल रस्त्यावर हे अस्वल मुक्तंसचार करतांना दिसून आल्याने परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मोलगी – साकली मार्गे हा रस्त्या देवमोगरा कडे जातो. त्यातच याच रत्याने दहेलच्या धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची देखील मोठी गर्दी असते त्यामुळे या रत्यावरुन वाहतूक करणाऱ्या प्रवाश्यांनी सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे. वनविभागाने याबाबत तात्काळा कारावाईची गरज स्थानिकांकडुन व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे परिसरात एकाहुन अधिक अस्वल असल्याचा दावा स्थानिकांकडून केल्या जात आहे. खर तर हा परिसर अस्वलांचे जंगल म्हणून ओळखल्या जातो मात्र गेली अनेक वर्ष कुठलही अस्वल असे दृष्टीक्षेपात आले नव्हते या व्हायरल व्हीडीओमुळे पुन्हा एकदा अस्वलांचा वावर असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!