खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र):- आषाढी एकादशी च्या महोत्सवा निमित्त पंढरपूर येथे गेलेल्या श्री संत गजानन महाराज पालखी चे आगमन 2 ऑगस्ट मंगळवारी खामगाव नगरीत घातले आहे .दरम्यान या पालखी मार्गातील अडथळे दूर करण्याची मागणी या निमित्ताने श्रीभक्तांकडून होत आहे.
पंढरपूरचा आषाढी महोत्सव आटोपून 13 जुलै रोजी श्री संत गजानन महाराज शेगाव ची पैदल वारी व पालखी शेकडो वारकरी भगव्या पताकांसह परतीच्या मार्गाला निघाली आहे.दरम्यान पालखी चे आगमन 2 ऑगस्ट मंगळवारी खामगाव नगरीत होऊ घातले आहे. कोरोना काळातील 2 वर्षांनंतर श्री संत गजानन महाराज पालखी शहरात दाखल होत असल्याने श्रीभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. हा उत्साह बघता श्रींची पालखी नगर परिक्रमा सहज करू शकेल याकरिता खामगाव शहरातील पालखी मार्गातील सिव्हील लाईन भागातील मोठी विहीर ते कुरळकर चौक पुढे जोशी मेंशन , शाळा क्र 6 चे मागून असलेल्या रस्त्यांवर यासह पालखी मार्ग झाडांच्या फांद्यांनी रस्ता अरुंद झालेला आहे.त्यामुळे पालखी मार्गात अडथळा निर्माण होण्याचे दिसून येत आहे.करीता स्थानिक नगर परिषद प्रशासनाचे वतीने झाडांच्या फांद्या कापून पालखी मार्ग मोकळा करण्याची मागणी श्री भक्तांकडून समोर येत आहे.अशी माहिती श्रीकांत भुसारी यांनी दिली आहे.