बिबी (ऋषी दंदाले) – येथील ज्ञानेश्वर भोकरे यांच्या हॉटेलचे कुलूप तोडून हॉटेलच्या काउंटरच्या ड्रॉपमधून १७ हजार रूपये चोरीस गेले होते. या चोरट्याचा बिबी पोलिसांनी काही तासांत छडा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बिबी पोस्टे अंतर्गत चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने पोलिसांसमोर आव्हान होते. बिबी पोलिसांनी तांत्रिक मदतीने मिळालेल्या माहितीवरून मौजे भुमराळा ता.लोणार येथील शंकर हरीभाऊ गारकर वय २० वर्षे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हॉटेलच्या काऊंटरमधून १७ हजार रूपये चोरल्याची कबुली दिली. सदर रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. सदर आरोपीस वि.न्यायालय लोणार समोर हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.
सदर गुन्हयाचा तपास बिबी पोस्टेचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे साहेब यांच्या मार्गदर्शाखाली पो उपनिरीक्षक बास्टेवाड साहेब, पोहेकाँ दिनेश चव्हाण, पोहेकाँ परमेश्वर शिंदे, नापोका अरूण सानप, पोकाँ विनायक मोरे, पोकाँ यशवंत जैवाळ, पोकाँ शिवाजी दराडे, पोकाँ रवि बोरे यांनी केला आहे.