Cinema

सुष्मिता सेनसोबत विवाहाची ललित मोदींची घोषणा

मुंबई : विविध लोकांसोबत तीनवेळा डेटिंग करणारी माजी विश्वसुंदरी सुष्मिता सेन हिच्यासोबत सद्या डेट करत असून, लवकरच लग्न करणार आहोत, अशी घोषणा माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांनी करून आज खळबळ उडवून दिली.
ललित मोदी यांनी आज सायंकाळी सहा वाजता या बाबतचे ट्वीट केले. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी माजी विश्वसुंदरी व अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासोबत विवाह करत आहोत, असे नमूद केले. तर लगेचच विवाह नाही तर सद्या डेट करत आहोत, लवकरच विवाहही करू, असे दुसरे ट्वीट मोदी यांनी केले. सुष्मिता सेन व ललित मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच मालदीव येथे सुट्ट्या एकत्रित घालवल्या होत्या.

यापूर्वी सुष्मिता सेन हिच्या जीवनात तीन पुरुष येवून गेले असून, तिने शेवटच्याक्षणी त्यांच्याशी विवाह टाळला होता. सद्या सुष्मिता ही अविवाहित आहे. तर मोदी हे घटस्फोटीत आहेत. त्यांनी आईच्या मैत्रिणीशीच विवाह केला होता. मीनल मोदी यांच्यापासून त्यांना रुचीर व आलिया असे दोन अपत्ये आहेत. आता मोदी हे दुसर्‍यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. ४७ वर्षीय सुष्मिता सेनदेखील सिंगल मदर असून, तिने दोन मुलींना दत्तक घेतलेले आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!