जिल्ह्यात पावसाचा जोर ;13 जुलैला सर्वाधीक 19.4 इंच पावसाची नोंद! मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 24.7 इंच जास्त पाऊस
बुलडाणा(ब्रेकींग महाराष्ट्र)- यावर्षी जून महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकरी बांधवांनी मृगातच पेरणी केली. परंतु नंतर पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. तर दुसरीकडे बँकेने वेळेवर पीक कर्ज पुरवठा वेळेवर न केल्याने शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घेवून शेती पेरावी लागली. जून महिन्याच्या दुसऱ्या आवठड्यात 4.22 टक्केच पाऊस पडला होता. तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 13 जुलैला 495.2 मि.मी.म्हणजेच 19.4 इंच एवढा यावर्षी सर्वाधिक जास्त पाऊस झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 15 जून पर्यंत एकूण 4.22 टक्के पाऊस झाला. यामध्ये बुलडाणा तालुक्यात 36.3 मि.मी., चिखली 49.3 मि.मी., देऊळगाव राजा 54.4 मि.मी., सिंदखेड राजा 72.2 मि.मी., लोणार 67.1 मि.मी., मेहकर 62.1 मि.मी., खामगाव 17.1 मि.मी., शेगाव 5.9 मि.मी., मलकापूर 11 मि.मी., नांदुरा 8.0 मि.मी., मोताळा 12.3 मि.मी., संग्रामपूर 4.8मि.मी. तर जळगाव जामोद तालुक्यात 17.2 मि.मी. अश्याप्रकारे 417.7 मि.मी. म्हणजे 16.4 इंच पाऊस झाला होता. त्याची टक्केवारी 4.22 एवढी आहे. तर जुलै महिन्यात 13 जुलै रोजी सर्वाधिक 495.2 मि.मी म्हणजे 19.4 इंच एवढा पाऊस झाला. यावर्षीची आकडेवारी पाहता बुलडाणा तालुक्यात सर्वाधीक 406.6 मि.मी. म्हणजे 16 इंच एवढा पाऊस झाला, तर सर्वाधीक पाऊस जळगाव जामोद तालुक्यात 125.8 मि.मी. म्हणजे 4.9 इंच एवढा पाऊस झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 24.7 इंच जास्त पाऊस जास्त पडला आहे.
अशी आहे पावसाची तालुकावाईज टक्केवारी..
यावर्षी 14 जुलैपर्यंत बुलडाणा तालुक्यात 47.26 टक्के पावसाची नोंद, चिखली तालुक्यात 41.76टक्के, दे.राजा 46.93 टक्के, सिं.राजा 46.99 टक्के, लोणार 31.65टक्के, मेहकर 42.31 टक्के, खामगाव 31.65 टक्के, शेगाव 41.60टक्के, मलकापूर 25.80टक्के, नांदुरा 28.89टक्के, मोताळा 32.10टक्के, संग्रामपूर 20.91टक्के तर जळगाव जामोद तालुक्यात 17.79टक्के एवढा पाऊस झाला आहे. मागील वर्षी 14 जुलै पर्यंत बुलडाणा जिल्ह्यात 2873.2 मि.मी. तर यावर्षी 3497.9 मि.मी. म्हणजेच 24.7 इंच एवढा जास्त पाऊस झाला आहे.
पाऊस इंचेसमध्ये कसा मोजतात..
भारतात सर्व भागामध्ये जून ते ऑक्टोबर हा पावसाचा कालावधी असतो. उत्तर भारतात हिमालयाच्या डोंगर रांगावर पाऊस हिमवर्षांवच्या स्वरूपातदेखील पडतो. पाऊस हा पाण्याचा उगम असल्यामुळे पाण्याच्या मोजणीचा विचार करीत असताना पावसाच्या मोजणीचे एकक हे मेट्रिक सिस्टीममध्ये मिलिमीटर तर ब्रिटिश सिस्टीममध्ये इंच (एक इंच म्हणजे २५.४ मिलिमीटर) आहे. बर्फाच्या स्वरूपातील पावसाची मोजणीदेखील याच एककात केली जाते. बुलडाणा जिल्ह्यात 13 जुलैला 495.2 मि.मी. पाऊस झाला म्हणजे 495.2 भागीला 25.4 म्हणजेच 19.4 इंच एवढा पाऊस पडला.