खामगांव (ब्रेकिंग महाराष्ट्र):- जनसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा रक्तसेवा फाउंडेशन तर्फे गुरुपौर्णिमा येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळ बिस्कीटाचे वाटप व तसेच रुग्णाला आर्थिक मदत करण्यात आली.
सर्व प्रथम एकनिष्ठा फाऊंडेशनच्या सदस्यांनी आपल्या आई वडिलांचे नतमस्तक होऊन त्यांचे दर्शन घेऊन सामान्य रुग्णालयात हा उपक्रम धनराज रावणकार आणि दत्ता रावणकार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी सुरजभैय्या यादव, सिद्धेश्वर निर्मळ, पुरुषोत्तम ठोसर, गजानन रावणकार, महादेव गिड्डे, अर्पित लोखंडे, ऋषिकेश सोळंके, कार्तिक तंबोली, सुरज जाधव, नंदू कान्हेरकर, अक्षय शर्मा, परशु चावरे, उमेश वानखडे, अमोल माने, विशाल राठोड, पवन उगले, अमोल सावरकर, अविनाश राठोड आदी लोकांनी गरीब गरजु गरीब रुग्णासाठी हा उपक्रम राबवून समाजा समोर एक आदर्श निर्माण केले. अशी माहिती दत्ता रावणकार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .