मेहकर (तालुका प्रतिनिधी) – सामाजिक जाणभाण व पत्रकारीतेतील भरीव योगदानाबद्दल , सकस लेखणीचे धनी पत्रकार कैलास हरिभाऊ राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. मातोश्री वत्सलाबाई बहुउद्देशीय संस्था साखरखेर्डा, महाराष्ट्र सारथी व दर्पण चौफेरच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. 30 डिसेंबररोजी साखरखेर्डा येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
देऊळगावमाळी येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते, संपादक कैलास राऊत सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव मानले जाते. गेल्या 18 वर्ष्यापासून त्याची पत्र सेवा सुरु आहे. मेहकर तालुख्यासह जिल्ह्याच्या प्रश्नावर ते सातत्यपूर्ण लिखाण करीत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत यंदाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी त्यांची निवडकरण्यात आली आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा देऊन साखरखेर्डा येथे 30 डिसेंबर रोजी सदर पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. तरुणाई फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम कैलास राऊत यांनी राबविले आहे. गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन अनेकांना मदतीचा हात त्यांनी दिला आहे. ते विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असून त्यांनी केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र व राज्याबाहेरील 90 पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत देखण्या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. या पुरस्काराबद्दल राऊत यांचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ मीडिया ग्रूपचे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे, सहसंपादक बाळू वानखेडे, सहाय्यक संपादक कैलास आंधळे, कार्यकारी संपादक प्राचीताई कुलकर्णी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.