आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज सांजवान समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी यात्रे अंतर्गत भागवत एकादशी ( कार्तिकी एकादशी यात्रा ) शनिवारी ( दि. ९ ) प्रथा परंपरांचे पालन करीत साजरी होणार आहे. आळंदी कार्तिकी यात्रे निमित्त परिसरात भाविकांची गर्दी झाली असून नामजयघोष, हरिनामाने अलंकापुरी दुमदुमली आहे.
माऊली मंदिरात भागवत एकादशी निमित्त शनिवारी १२ : ३० ते पहाटे २ या वेळेत ११ ब्रम्हवृंदांच्या वेदमंत्रजय घोषात पवमान अभिषेक व दुधारती होणार आहे. दुपारी १२ ते १२ : ३० महानैवेद्य, त्यानंतर १ वाजता श्रींचे पालखीची नगर प्रदक्षिणा, रात्री ८ : ३० धुपारती, रात्री १२ ते २ श्री मोझे यांचेतर्फे जागर सेवा होणार आहे. दरम्यान मंदिरात बुधवारी ( दि. ६ ) दैनंदिन धार्मिक कार्यक्रम पहाटे पवमान, अभिषेक व दुधारती, पहाटे भाविकांचे नित्यनैमित्तिक श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारीचा महानैवेद्य, वीणा मंडपात ह भ प बाबासाहेब देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, धुपारती, वीणा मंडपात हभप वासकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा झाली.
गुरुवारी ( दि. ७ ) पहाटे पवमान अभिषेक व दुधारती, श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी महानैवेद्य, गंगुकाका शिरवळकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, वीणा मंडपामध्ये धोंडोपंत दादा अत्रे यांच्या तर्फे कीर्तन सेवा, श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा, वासकर महाराज कीर्तन सेवा (वीणा मंडप), धुपारती, वाल्हेकर महाराज यांचे तर्फे जागर सेवा झाली. कार्तिक वद्य दशमी शुक्रवारी ( दि. ८ ) परंपरेने पहाटे पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी महानैवेद्य, सायंकाळी वीणा मंडपात ह. भ. प. गंगुकाका शिरवळकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, धोंडोपंत दादा अत्रे यांच्या तर्फे कीर्तन सेवा, धुपारती, रात्री वीणा मंडपात ह. भ. प. वासकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. रात्री ११ :३० ते १२ :३० वीणा मंडपात वाल्हेकर महाराज यांचेतर्फे जागर सेवा होणार आहे. आळंदीत श्री श्री रविशंकर यांचे साधक सेवक यांचेसह आर्ट ऑफ लिव्हीग पिंपरी चिंचवड शहर यांचे वतीने भाविकांचे दर्शन बारीत पिण्याचे पाण्याची सेवा, अन्नदान सेवा, आरोग्य तपासणी शिबिरात आरोग्य तपासणी रुजू झाली आहे. या ठिकाणी भाविकांनी गर्दी करून सेवेचा लाभ घेतला. इंद्रायणी नदी घाटावर भाविकांनी स्थान महात्म्य जोपासत तीर्थक्षेत्री स्नान करीत हरिनाम गजरात प्रदक्षिणा आणि श्रींचे दर्शनास गर्दी केली. भागवत एकादशी दिनी पिण्याचे पाणी वाटपासह केली वाटप देखील करण्यात येणार आहे.
श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी आणि कार्तिकी वारी निमित्त ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७२८ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास आलेल्या वारकरी भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. श्री आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वतीने अन्नदान सेवा रुजू झाली. कार्याध्यक्ष सचिन महाराज शिंदे, दिनकर तांबे, माऊली घुंडरे, श्री ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर व्यवस्थापक ज्ञानेश्वर वाघमारे, बाळकृष्ण वाघमारे आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसाठी पुजारी वाघमारे परिवाराने परिश्रम घेतले.
वै. ह.भ.प बाळकृष्ण महाराज फणसे वारकरी बाबा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र फणशी चे वतीने आयोजित करण्यात आला आहे. काल्याची कीर्तन सेवा ह.भ.प. मयूर महाराज कोंडे यांचे सुश्राव्य किर्तन सेवा झाली. यावेळी कोंडे महाराज यांचा सत्कार बाळकृष्ण महाराज फणसे दिंडी क्र ८८ चे अध्यक्ष दिनकर धरपाळे यांच्या हस्ते करण्यात आला. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील साधक मुलांचा सन्मान करण्यात आला. आळंदी वारीला फणशी येथून आलेल्या दिंडीचे स्वागत श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थे तर्फे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, संचालक सचिन महाराज शिंदे यांनी केले.