Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraPune

तळवडेतील फटाका गोदामाला भीषण आग, सात ठार

पुणे (प्रतिनिधी) – पिंपरी – चिंचवड परिसरातील तळवडे भागात असलेल्या एका फटका गोदामाला भीषण आग लागून त्यात सात कामगार होरपळून ठार झाले आहेत. तर आठ कामगार गंभीर जखमी झालेले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृतांमध्ये सर्व महिलांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच महापालिकेसह इतर अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना सूरू असल्याची माहिती समोर आली आहे. वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्ती आणि फटाक्यांची ही कंपनी असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी पोलिस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून, अग्निशामक दलाकडून आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, आठ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तळवडे येथील sparkling candle बनवणाऱ्या कारखान्याला ही आग लागल्याचे समोर आले असून, धक्कादायक बाब म्हणजे हा कारखाना विनापरवाना सुरू होता. या घटनेत दोन कामगार हे गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आणखी आठ कामगारांना कारखान्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटची तीव्रता एवढी होती की, आवाजाने शटर बंद झाले होते. त्यामुळे महिलांना बाहेर पडणे अवघड झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अजून काही महिला जखमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


घटना घडल्यानंतर जवळ असलेल्या नागरिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले होते. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी घटनास्थळी दाखल झाले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!