लोणार (तालुका प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यामधीलप्रमुख मागण्या सध्या सुरू असलेल्या कोतवाल भरतीमध्ये तालुक्यातील कुठल्याही गावातील रहिवासी असलेल्या उमेदवाराला ग्राह्य धरण्यात यावा. शासनाने कंत्राटी भरतीचा काढलेला (जीआर)शासन निर्णय रद्द करण्यात यावा. सन २००८ मध्ये मंजूर असलेला लोणार बायपास रोडचे काम तात्काळ करण्यात यावे. किनगाव जट्टू रोडच्या बोगस कामाची तत्काळ चौकशी करून ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात यावा. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या रमाई आवास पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान शहराप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा अडिच लाख रूपये देऊन रखडलेल्या घरकुलाचे उद्दिष्ट त्वरित देण्यात यावे, या मागण्याचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना वंचित नेते नागवंशी संघपाल पनाड,महासचिव बळी मोरे,तालुका महासचिव सुनील इंगळे,सागर जाधव,भाई विलास लहाने, सुभाष मोरे,युवा शहराध्यक्ष महेंद्र मोरे,शहर उपाध्यक्ष दीपक अंभोरे,कडूबा चव्हाण,मंगेश मोरे, अजय मोरे,अरबाज पठाण,राहुल चव्हाण,दीपक काळे सह शेकडो वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.