– वर्ग 8 ते बारावीच्या 288 मुलींना मिळाली सायकल
लोणार (उध्दव आटोळे) – राज्यातील इयत्ता ८ वी ते १२ पर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून ५ कि.मी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना ‘महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन मार्फत राबविली जात आहे.सदर योजने अंतर्गत मुलींना शाळेत येण्या जाण्याचे सोयीचे होण्यासाठी मानव विकास मिशन योजनेअंतर्गत श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोणार येथिल वर्ग आठ ते बाराच्या तब्बल 288 मुली यासाठी पात्र ठरल्या, त्यानुसार दि. 25/09/2023 रोजी शाळेतर्फे भव्य सायकल वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता,या दिमाखदार सोहळ्यामध्ये सावित्रीच्या लेकींना ह्या सायकली वितरीत करण्यात आल्या.
हिरडव चौक ते शिवाजी हायस्कूल पर्यंत वाजत गाजत लेझीम पथकासह मोठ्या उच्चहात सायकल रॅली काढून मुलींनी पर्यावरण विषयक जनजागृती केली.तसेच या सायकल वाटपप्रसंगी आपल्यातील दातृत्वाचा परिचय देत कु.सायली अरुण मापारी हिने आपल्याला मिळालेली सायकल कु.दिशा लहाने ह्या आपल्या गरजू व होतकरू मैत्रिणीला भेट दिली. या सायकल वितरण कार्यक्रम प्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.खुशाल मापारी,संस्थेचे सचिव प्रकाश मापारी,कोषाध्यक्ष विजय मापारी,गट समन्वयक जंगलसिंग राठोड,पत्रकार उमेश पटोकार,मयूर गोलेच्छा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य म्हस्के सर,पर्यवेक्षक इंगळे सर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 288 सायकल श्री शिवाजी हायस्कूल लोणार ला प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थिनी,पालक व सर्व शिक्षक वृंद यांच्यामध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.