Head linesLONARVidharbha

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

बिबी (ऋषी दंदाले) – अवघ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने बंद असलेल्या घरामधील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार लोणार तालुक्यातील खळेगाव येथे घडला आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात होती. या मुलाच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

खळेगाव येथील दीपक किशोर साळवे (वय १६) हा मुलगा बाहेरून येतो, असे घरी सांगून घराबाहेर पडला होता. परंतु, जुन्या झोपडपट्टीमधील पाठीमागील एका बंद घरात गेला व त्यातील लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला. रविवारी (दि.1) दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तो सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. परंतु, दुपारपर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तो जीवंत असेल असे समजून तातडीने त्याला त्याच्या आजोबा व काकाने खाली उतरवले, परंतु, त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या आजोबांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून बिबी पोलिसांनी आकस्माक मृत्यूची नोंद घेतली आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातारणात त्याच्या पार्थिवावर गावात अंत्यविधी करण्यात आला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!