आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यात कायदा व सुव्यवस्था जातीय सलोखा व शांतता राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन गृह विभाग तर्फे १५ जुलै २०१५ शासन निर्णया नुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ स्तरावर शांतता समिती समिती मध्ये येथील आळंदी पोलीस स्टेशन साठी समिती गठीत करण्यात आली आहे. या शांतता समिती मध्ये आळंदीतील प्रतिष्ठित नागरिक डी.डी. भोसले पाटील, उत्तम बबनराव गोगावले, राजाभाऊ रंधवे चोपदार यांचा समावेश आहे.
या शिवाय पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण / एम. आय. डी. सी. भोसरी विभाग राजेंद्र गौर, विधान परिषद आमदार श्रीमती उमाताई खापरे, भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, खेड विधानसभा आमदार दिलीप मोहिते यांचा देखील या गठीत केलेल्या समितीत समावेश आहे. या संदर्भात पिंपरी चिंचवड परिमंडळ ३ पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे यांनी पिंपरी चिंचवड परिमंडळ ३ अंतर्गत आळंदी सह ६ पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समिती गठीत करण्यात आल्याचे आदेशित केली आहे. संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आपापले पोलीस ठाण्याचे हद्दीतील शांतता कमिटी सदस्य यांना अवगत करण्याचे सूचना दिल्या आहेत. आळंदी सह चाकण, महाळुंगे, दिघी, एम.आय.डी.सी भोसरी आणि चिखली पोईस स्टेशन कार्यक्षेत्रातील समिती सदस्यांना देखील या समितीत घेण्यात आले आहे.