हिवरा आश्रम,ता. मेहकर (प्रतिनिधी) – हिवरा आश्रम येथे ‘हर घर तिरंगा’ हे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे अभियान उत्साहात राबविण्यात आले. गावात माेठ्या संख्येने घराघरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला हाेता. तर ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ.लक्ष्मी संताेष थोरहाते यांना मिळाला.
‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले होते. सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती, तसेच अंगणवाड्या, शाळा, रुग्णालये यासह सर्व शासकीय संस्थांवर राष्ट्रीय ध्वज फडकवावा, हर घर तिरंगा वेबसाइटवर तिरंग्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचा सल्ला पंतप्रधान मोदींनी जनतेला दिला होता. तिरंगा हे आपल्या स्वातंत्र्य आणि अखंडतेचे प्रतिक आहे. प्रत्येक भारतीयाचे तिरंग्याशी एक भावनिक नाते आहे. जो प्रत्येक भारतीयाला देशाच्या दिशेने प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करीत असल्याचे विचार यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. दुनगू यांनी मांडले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद व उत्साह ओसांडून वाहत असल्याचे दिसून आले. मुख्याध्यापक पी. बी. दुनगु,एस यू पवार, एस एच पुरी, कु एम एस म्हस्के, कु एस पी तुपकर,कू ए एस साखरे ,कु आर एस सजगुरे तथा पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.