नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – प्रत्येकाला आषाढीच्या वारीला जाणे शक्य नसते, त्यात प्रत्येकाच्या मनात विठ्ठलाच्या प्रती असलेला भाव ठायीठायी भरलेला असतो. हेच लक्षात घेत शहादा तालुक्यातील कहाटुळ येथील के. वाय. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही विठू नामाची गोडी लागली असून, शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात दिंडी काढली. या दिंडीत शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थी, विद्यार्थिनी विविध भजन गात नृत्यात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. आषाढीच्या पूर्व संध्येला गावात भक्तीमय वातावरण पाहण्यास मिळाले. चिमुकल्यांनी साकारलेल्या विविध वेशभूषा गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. हरिनामाचा गजर करत आषाढीच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांच्या वारी विठ्ठलाच्या दारी हे चित्र मनाला समाधान देऊन जाणारे होते.
Read Next
September 28, 2024
मोहन भागवतांना अजितदादांचे चोख प्रत्युत्तर; शिवरायांची समाधी महात्मा फुलेंनीच शोधली!
September 3, 2024
ऐन सणासुदीत लालपरीची चाके थांबली; एसटी कर्मचारी संपावर!
May 24, 2024
ममता बॅनर्जींच्या प्रतिमेला जोडे मारले, जळगावात भाजपचे जोरदार आंदोलन
March 3, 2024
जळगावचे खासदार उन्मेष पाटील अडचणीत!; फसवणूकप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये तक्रार दाखल
February 2, 2024
अजीम नवाज राहीच्या सुश्राव्य सूत्रसंचालनात होणार निमंत्रितांचे कवीसंमेलन !
Leave a Reply