विक्रमगड (ब्रेकिंग महाराष्ट्र) – जेष्ठ निरुपणकार तथा महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय विक्रमगड (वाकी-मलवाडा) येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विद्यालयाच्या आवारात विविध प्रकारची 100 वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगडच्या तहसीलदार श्रीमती चारुशीला पवार यांच्या उपस्थितीत झाले. यादरम्यान मनोगत व्यक्त करतांना मुलींनी विविध स्पर्धा परीक्षा (mpsc, upsc) कशा पद्धतीने यश संपादन करावे, ह्याविषयी मार्गदर्शन केले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ह्याप्रमाणे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाचे सामाजिक कार्य, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व संवर्धन असे विविध उपक्रम अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने पार पाडले जातात याबाबत प्रतिष्ठानचे कौतुक केले. ह्या कार्यक्रमात वाडा विभागातील दास-दासी उपस्थित होते.