ChikhaliKokanWomen's World

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्याहस्ते जिल्ह्याची सुकन्या क्षमा काटकरचा सुवर्णपदकाने सन्मान

– क्षमा ही आ. श्वेताताई महाले यांचे स्वीय सहाय्यक चंद्रकांत काटकर यांची कन्या

चिखली/दापोली (महेंद्र हिवाळे) – शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत बुलढाणा जिल्ह्याची सुकन्या क्षमा चंद्रकांत काटकर हिने एम. एससी.( पीएचएम) या विषयात सुवर्णपदकासह पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, विद्यापीठाच्या ४२ व्या पदवीदान समारंभात राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्याहस्ते (ऑनलाईन उपस्थितीत ) तिला सुवर्णपदक आणि पदवीदान करण्यात आले आहे. क्षमा ही चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे स्वीयसहाय्यक चंद्रकांत काटकर यांची कन्या आहे. तिच्या या गुणवत्तापूर्ण यशाने बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

क्षमा काटकर हिने शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये डॉ.बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठातून एम. एससी.( पीएचएम) या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यात तीने 9.25 सि.जी.पी.ए. घेऊन विशेष प्राविण्यासह सुवर्णपदक प्राप्त केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचा ४२ वा पदवीदान समारंभ दिनांक १८ मार्चरोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न झाला. सर विश्वेश्वरैया सभागृह, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी येथे झालेल्या शानदार सोहळ्यात अनेक स्नातकांना विविध विषयात सुवर्ण पदके आणि पदवीदान करण्यात आल्या. क्षमा हिने बिटेक कृषी पदवीपर्यंतचे शिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे तर पाचवी ते बारावीचे शिक्षण भारत विद्यालय बुलढाणा आणि पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले शाळा बुलढाणा येथे घेतलेले आहे.
यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत (ऑनलाइन), प्रमुख अतिथी UDCT चे माजी कुलगुरू डॉ. जे. बी. जोशी, डॉ. BSKKV, दापोलीचे मा. कुलगुरू डॉ. संजय भावे, MPKV राहुरी चे मा. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील; डॉ. पी. एस. बोडके, डिन कृषी, डॉ. बीएसकेकेव्ही, दापोली, डॉ. पी. ई. शिनगारे, संशोधन संचालक, डॉ बीएसकेकेव्ही (ऑनलाइन), डॉ.प्रदीप हळदवणेकर, कुलसचिव, डॉ.बीएसकेकेव्ही, दापोली, माजी VC, EC, AC सदस्य, असोसिएट डीन्स, HoDs, सर्व प्राध्यापक, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सर्व अधिकारी , कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते. क्षमाचे मुख्य प्रकल्प मार्गदर्शक डॉ. आय. एल. परदेशी, महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. पतंगे व इतर प्राध्यापक डॉ. एस. बी. स्वामी, डॉ. पी. पी. रेळेकर, डॉ. जी. डी. शिर्के, डॉ. जे. एच. कदम, डॉ. आर. सी. रणवीर, डॉ. जी. ए. वाईकर, श्री.निखिल राठोड सर, सौ. जाधव मॅडम, श्री. साळवी सर चे अमूल्य मार्गदर्शन, व अशिक्षकीय कर्मचारी श्री. पाटील, श्री. रुपेश मोहिते, श्री. गौरव मोहिते, श्री. घुगरे, श्री. चौघुले, आदी’ चे मोलाचे सहकार्य विशेषतः नमूद करावे असे होते. क्षमा, आपल्या सहयोगी मित्रांनादेखील आपल्या यशाचे सहभागी मानते. तसेच आपले आईवडील, सासरची प्रोत्साहित करणारी मंडळी, भावंडे, नातलग यांचे विशेष धन्यवाद मानते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!