Khandesh

नंदुरबार जिल्ह्यात धाे धाे! चाेवीस तासांत 78 मिलीमीटर पावसाची नाेंद

48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून बळीराजाला दमदार अशा पावसाची प्रतीक्षा होती. गेल्या २४ तासात जिल्ह्यात दमदार असा पाऊस झाला असून या हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक ७८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे बळीराजा समाधानी झाला आहे.

अनेक दिवसापासून कोरडे असलेल्या नदी नाल्यांना पूर आले आहेत तर काही ठिकाणी साठवण बंधारे ओव्हर फ्लो झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. नदी नाले प्रवाहित झाल्याने जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.  तर दुसरीकडे धरणांच्या पाणी साठ्यांमध्येही काही अंशी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  येत्या ४८ तासात नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!