नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पालिकेच्या मुदत संपल्यानंतर पालिकेवर प्रशासक राज होते. आता मुदत संपलेल्या पालिकेची निवडणूक जाहीर झाली असून त्यात शहादा पालिकेचा समावेश असल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
सर्वच पक्ष निवडणूक आयोग कधी निवडणुकीच्या तारखा जाहीर करतो या कडे लक्ष ठेऊन होते. शहादा पालिकेत भाजपची सत्ता होती अस म्हणता येईल या पालिकेत लोक नियुक्त नगराध्यक्ष भाजपचा होता तर सर्वाधिक नगरसेवक काँग्रेस चे होते. मात्र आता पालिकेत कश्या प्रकारे आघाडी आणि युती होते यावरून पालिकेची पुढील रणनीती यावर असेल. अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी तयार असल्याने स्थानिक स्थरावर पण काही आघाडी तयार होते का हे पाहणे महत्वाचे ठरेल. शहादा नगर पालिकेत लोक नियुक्त नगर अध्यक्ष भाजपचे होते.
पक्षीय बलाबल
काँग्रेस – ११
भाजपा – १०
अपक्ष – ०२
राष्ट्रवादी – ०१
एम आय एम – ०४