वारक-यांचे श्रद्धास्थान पवित्र इंद्रायणी नदीची अवस्था दयनीय : आमदार मोहिते पाटील
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीची अवस्था दयनीय झाली असल्याचे खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांनी सांगितले. देहू आळंदीतून वाहणाऱ्या पवित्र्य इंद्रायणी नदीच्या प्रदूषणा बाबत व्यथा मांडताना ते बोलत होते.
आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील म्हणाले, विशेष म्हणजे, औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील लाखो लीटर रसायन मिश्रीत पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात सोडले जाते. याकडे पर्यावरण विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष असून, शेतकरी, वारकरी यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. तसेच तीर्थक्षेत्र आळंदीची लोकसंख्या सुमारे ५० हजाराच्या घरात आहे. याठिकाणी राज्यातून महिन्याला लाखो भाविक येत असतात. मात्र, पिंपरी-चिंचवड मधील औद्योगिक पट्ट्यातून इंद्रायणी नदीत मिसळणारे रसायन मिश्रीत सांडपाणी शुद्ध करण्याची कोणतीही यंत्रणा आळंदी नगरपरिषदेकडे नसून, आळंदीतील नागरिक पिंपरी-चिंचवड महापालिकेने दुषित केलेले पाणी पीत आहेत, भविष्यात, रसायन मिश्रीत पाणी पिल्याने नागरिक अथवा जनावरांच्या जीवला धोका झाल्याने अनुचित प्रकार घडल्यास पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला जबाबदार आहे, तीर्थक्षेत्र देहू-आळंदी आणि खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून इंद्रायणी नदी वाहते. पावसाळ्यात ही नदी दुथडी भरुन वाहते. यावर्षी पाउस भरपूर झाला, त्यामुळे नदी पात्र स्वच्छ झाले, परंतु पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून मोठ्या प्रमाणात रसायन मिश्रीत पाणी कोणतीही प्रक्रिया न करता इंद्रायणी नदी पात्रात सोडले जात आहे या प्रकरणी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने अनेकदा पिंपरी -चिंचवड महापालिकेला नोटिस बजावली गेली, परंतु, महापालिका प्रशासन त्याला जुमानत नाही, त्यामुळे तातडीने याबाबत गांभीर्याने लक्ष घालून योग्य उपाय योजना न केल्या मुळे या नदीतील पाणी जनावरे पीत नाही. शेतीचेही नुकसान होत आहे, औद्योगिक कंपन्यां मधील केमिकल्समुळे पूर्ण नदी दुषित झालेली आहे, नदी पात्रातील जलचर मृत्यूमुखी पडत आहेत. जलचरांचे प्रमाण कमी झाले आहे, असे पर्यावरण तज्ञांचे मत असून, त्याच भागात नदीकाठच्या गावांमध्ये पाणी उचलण्याची परवानगी असतानाही रसायनयुक्त प्रदूषणामुळे नदीकाठचे कोणतेही शेतकरी शेती वा तस्सम कामासाठी नदीतील पाणी उचलू शकत नाहीत, दुषित पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच, नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड महपालिका प्रशासनाच्या हद्दीतील तळवडे ते चन्होली या भागातून थेट औद्योगिक सांडपाणी नदीला येवून मिसळणारे नाले तातडीने बंद केले पाहिजे. तसेच चिखली-मोई येथील पुला जवळ स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात यावा. त्याप्रमाणे महापालिकेला सूचना देण्यात याव्यात, व नदी प्रदुषणा बाबत पिंपरी-चिंचवड पर्यावरण रक्षण आणि इंद्रायणी नदी संवर्धना बाबत ची मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार मोहिते पाटील यांनी शासनाचे निदर्शनास आणून दिली असल्याचे सांगितले.
आमदार मोहिते पाटील यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाचे प्रश्नात सातत्याने लक्ष घालून नदी प्रदूषण रोखण्यास विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केलेल्या मागणी निमित्त भ्रश्टाचार विरोधी जण आंदोलन समिती पुणे जिल्हा संघटक पै. बाळासाहेब चौधरी, आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांचे तर्फे अभिनंदन.