ChikhaliVidharbha

शेतीचे वाद टाळा, माणूस वाचला तरच शेती आहे – ठाणेदार दुर्गेश राजपूत

– ठाणेदारपदी नियुक्ती होताच गुन्हेगारीला बसविला चाप!

चिखली (महेंद्र हिवाळे) – शेतीवरील वाद हे निरर्थक असून, या वादामध्ये माणूस आयुष्यातून निघून जातो, शेत हे तिथेच राहते आणि वादही तिथेच राहतो. माणूस खांद्यावर जातो, शेती जात नाही. शेती कायम राहते. माणूस जर वाचला तर शेती आहे, म्हणून वाद टाळून संयमाने घ्या, असा मोलाचा सल्ला रायपूर पोलिस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी शेतकर्‍यांना दिला. साकेगाव येथे शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. रायपूरच्या ठाणेदारपदी दुर्गेश राजपूत यांची नियुक्ती होताच त्यांनी गुन्हेगार शोधमोहीम, लॉज व गेस्ट हाऊस यांची तपासणी, तसेच सैलानी परिसरातील अवैध धंद्याना चाप लावण्याचे काम केल्याने त्यांची गुन्हेगारांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. दरम्यान, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे यांनी राजपूत यांच्या धडाकेबाज कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पत्रकारांचे सहकार्य मोलाचे असते. पत्रकारांनीही आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदारांनी याप्रसंगी केले.

रायपूर पोलिस ठाण्याला यापूर्वी राजवंत आठवले हे ठाणेदार असताना त्यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडून या पोलिस ठाण्याच्या हद्दीत शांतता राखली होती. आतादेखील दुर्गेश राजपूत यांच्यासारखे कर्तव्यनिष्ठ अधिकारी या ठाण्याला ठाणेदार म्हणून आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. रूजू होताच त्यांनी सैलानी येथे गुन्हेगार शोधमोहीम व लॉज, गेस्ट हाऊस व मालक यांची झाडाझडती घेतली. तसेच, रायपूर व सैलानी येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत निर्णय घेऊन वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावला आहे. ते नुकतेच साकेगाव, अंत्री कोळी, वाघापूर, रायपूर या भागात पाहणी दौरा करण्यासाठी आले असता, येथील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला. साकेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांनी अभिवादन केले. तसेच, नुकतेच पीएसआयपदी नियुक्त झालेले प्रदीप निकाळजे यांचादेखील त्यांनी सत्कार केला. साकेगावमधील विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. या भागामध्ये शेतीवरून जास्तीत जास्त वाद होतात, या वादामध्ये माणूस आयुष्यातून निघून जातो, शेत हे तिथेच राहते आणि वादही तिथेच राहतो. माणूस खांद्यावर जातो, शेती जात नाही. शेती कायम राहते. माणूस जर वाचला तर शेती आहे, म्हणून वाद टाळून संयमाने घ्या, असा सल्ला त्यांनी शेतकर्‍यांना दिला.

अंत्री कोळी येथील विठ्ठल गिरी, ब्रेकिंग महाराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे, सतिष वाघ, दीपक वाघ, सुरेश वाघ, समाधान हिवाळे, राहुल हिवाळे, समाधान मोरे व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी ठाणेदार राजपूत यांचे स्वागत व सत्कार केला. शिवराजे मित्र मंडळ, योगेश डुकरे, अमोल मोरे, ऋषिकेश डुकरे, पवन गिरी, कृष्णा भारती, विठ्ठल डुकरे, प्रदीप इंगळे अंत्री कोळी यांनी शाल, हार देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी पोलिस हेडकॉन्स्टेबल झाल्टे, दळवी, गाढवी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच, नवनियुक्त पीएसआय प्रदीप निकाळजे, ग्रामपंचायत सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव जितु निकाळजे, माजी अध्यक्ष खरेदी विक्री संघ दिलीप पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष अंबादास तायडे, माजी सैनिक अभिमन्यू निकाळजे, माजी सरपंच आसराफ बोरिवले, विष्णू निकाळजे, उत्तम निकाळजे, पंजाबराव निकाळजे, मनोहर निकाळजे, जगन्नाथ लोखंडे, दामोदर निकाळजे, संदीप सोळकी, आलम खान, संदीप पालकर, महेंद्र हिवाळे, सुधाकर जाधव, विठ्ठल पवार, प्रवीण वानखडे, रणधीर निकाळजे, पठाण, पवार, सुनील जाधव, अजय वानखडे, योगेश पाटील, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, सर्व गावकरी यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थिती होती.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!