बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील भुमराळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे सरचिटणीस देवानंद सानप यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे-पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त भुमराळा येथे शंभर नारळाच्या झाडांची लागवड करुन वाढदिवस साजरा केला. आपल्या नेत्यांचा अशा अनोख्या पद्धतीने वृक्षारोपणाने वाढदिवस साजरा केला जाण्याची ही पहिलीच घटना आहे.
वाढदिवस साजरा करत असतांना सानप यांनी आवाहन केले की, कुठल्याही नेत्याचा वाढदिवस साजरा करतांना झाडांची लागवड करुन साजरा केला जावा. ग्रामीण भागात झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे वेळेवर पाऊस न पडणे, दुष्काळ पडणे ऑक्सिजनची कमतरता, अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे झाडे लावून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन सानप यांनी केले आहे. या वृक्षारोपणप्रसंगी सानप यांच्या पत्नी गीता सानप, मुलगा अजय सानप, मुलगी राजनंदिनी सानप हेदेखील उपस्थित होते.